लाडक्या बहिणींकरता फक्त वीस हजार रुपये भरून पिंक ऑटो रिक्षा.

लाडक्या बहिणींकरता फक्त वीस हजार रुपये भरून पिंक ऑटो रिक्षा…

जळगाव – जळगाव शहर, पाळधी, शिरसोली, कुसुंबा, कानळदा, आसोदा, मामुराबाद, नशिराबाद येथील ज्या भगिनी पिंक ऑटो रिक्षा चालवण्यास उत्सुक असतील त्यांच्याकरता मराठी प्रतिष्ठानने फक्त वीस हजार रुपये डाऊन पेमेंट भरून रिक्षा मिळवून देण्याची संधी निर्माण केली आहे.
मराठी प्रतिष्ठान तर्फे लायसन्स, बॅच, कच्चे परमिट, पक्के परमिट बनवण्याकरता प्रशासकीय पाठपुरावा व रिक्षा चालवण्याचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  पिंक रिक्षा घेण्याकरता राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा सुद्धा मराठी प्रतिष्ठान करणार आहे.गेल्या पाच वर्षापासून जळगाव शहरांमध्ये वीस महिला पिंक आटो रिक्षा चालवत आहे व त्यांना महिला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद आहे.

ज्या भगिनींची पिंक आटो रिक्षा चालवण्याची इच्छा असेल त्यांनी मराठी प्रतिष्ठानच्या गणपती नगर येथील कार्यालयात आधार कार्ड पॅन कार्ड सह संपर्क साधावा पण नाव नोंदणी करावी. फक्त वीस महिलांकरता ही संधी उपलब्ध असल्यामुळे तातडीने संपर्क नाव नोंदणी करावी अशी माहिती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे यांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.