मराठी न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनसेतर्फे दिले जाणार प्रशिक्षण. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन.

मराठी न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनसेतर्फे दिले जाणार प्रशिक्षण. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन.जळगाव शहरातील बँका, शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा सक्तीने वापर करणे व मराठी न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत.महोदय, आपणांस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अत्यंत आदरपूर्वक निवेदन करण्यात येत आहे की, महाराष्ट्र ही मराठी माणसांची भूमी असून मराठी ही या राज्याची राजभाषा आहे. या भूमीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मराठी भाषा समजावी, वापरावी आणि तिचा सन्मान करावा, हीच अपेक्षा.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक व लोकप्रिय नेते मा. राजसाहेब ठाकरे यांनी नेहमीच मराठी अस्मिता, भाषा व संस्कृतीच्या जपणुकीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यांच्या प्रेरणेतून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर मराठीचा अभिमान बाळगणारी चळवळ चालवित आहोत. त्याचच एक भाग म्हणून आम्ही जळगाव शहरातही मराठीचा वापर सक्तीने होण्यासाठी पुढाकार घेत आहोत.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिनांक २१ जून २०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, सर्व बँकांनी स्थानिक भाषेत म्हणजेच महाराष्ट्रात मराठीमध्ये ग्राहकांशी व्यवहार करणे बंधनकारक आहे.

परंतु दुर्दैवाने जळगाव शहरातील अनेक बँकांमध्ये अजूनही हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच व्यवहार होतो आणि मराठी भाषा वापरण्यात येत नाही. मराठी भाषेचे हे दुर्लक्षण अत्यंत लज्जास्पद आहे.याशिवाय काही शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर टाळला जात असून, अनेक अधिकारी व कर्मचारी वर्गाला मराठी वाचन, लेखन अथवा संभाषण करता येत नाही. त्यामुळे मराठी भाषिक जनतेला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खालील पुढाकार घेण्यात येत आहे: 1. मराठी न येणाऱ्या बँक व कार्यालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मराठी भाषा शिकवण्याचे वर्ग जळगाव शहरात आयोजित करण्यात येणार आहेत. 2. जळगाव येथील नामवंत प्रबोधन संस्था या उपक्रमात सहभागी होऊन मराठी शिकवण्यासाठी आवश्यक शिक्षक, वर्गखोल्या व साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देणार आहेत. 3. या वर्गांमध्ये सुरुवातीस बँक कर्मचारी, खासगी व सरकारी कार्यालयांतील अधिकारी यांना प्राधान्य दिले जाईल.मा. जिल्हाधिकारी महोदय, याप्रसंगी खालील मागण्यांचा विचार करावा, ही नम्र विनंती:

रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार सर्व बँकांमध्ये मराठी भाषेतील कामकाजाची सक्ती करावी. मराठी न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मराठी शिकवण्याचे आदेश देऊन त्यांची उपस्थिती अनिवार्य करावी. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी वापराचे निरीक्षण करणारी समिती स्थापन करण्यात यावी. मराठी भाषा ही आमची अस्मिता आहे. तिचा गौरव राखण्यासाठी आम्ही सर्व स्तरांवर प्रयत्नशील आहोत. आपल्या माध्यमातून या उपक्रमास प्रशासनाची साथ मिळाली, तर हा उपक्रम अधिक प्रभावी व यशस्वीरीत्या राबवता येईल. आपण याची गांभीर्याने दखल घ्याल, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. दरम्यान मराठी भाषा ज्यांना शिकायची असेल त्यांनी जळगाव शहर कार्यालय प्रमुख राजेंद्र निकम व श्रीकृष्ण मेगडे यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क नंबर खालील प्रमाणे 9422777566 / 9965480555 दरम्यान निवेदन देतेवेळी ॲड जयप्रकाश बाविस्कर नेते मनसे ॲड जमील देशपांडे जिल्हाध्यक्ष महानगराध्यक्ष विनोद शिंदे महानगराध्यक्ष किरण तळेले जिल्हा संघटक राजेंद्र निकम महानगर संघटक श्रीकृष्ण मेंगडे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, ललित शर्मा, संदीप मांडोळे, साजन पाटील, खुशाल ठाकूर, राहुल चव्हाण,प्रशांत सूर्यवंशी, दीपक चौधरी, नयन ठाकूर, पवन सपकाळे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.