एकाच रात्री, एकाच रस्त्यावर तीन अपघात, सोमवार घातवार ठरला, महाराष्ट्र हादरला.

21 एप्रिलला रात्रीच्या सुमारास अकोला-मूर्तिजापूर मार्गावर तीन वेगवेगळे अपघात झाले, यात पाच जण जखमी तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची घटना घडताच स्थानिक चण्डिका माता आपत्कालीन पथक व वंदेमातरम आपत्कालीन पथकाने तातडीने गंभीर जखमींना रुग्णालयात हलवले मात्र वाटेतच एकाची प्राणजोत मालवली.अकोला जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. त्याच बरोबर अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढते आहे. 21 एप्रिलला रात्रीच्या सुमारास अकोला-मूर्तिजापूर मार्गावर तीन वेगवेगळे अपघात झाले, यात पाच जण जखमी तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची घटना घडताच स्थानिक चण्डिका माता आपत्कालीन पथक व वंदेमातरम आपत्कालीन पथकाने तातडीने गंभीर जखमींना रुग्णालयात हलवले मात्र वाटेतच एकाची प्राणजोत मालवली
पहिला अपघात.

अकोला-मूर्तिजापूर महामार्गावरील दाळंबी येथील नवीन वस्तीजवळ अकोल्याकडे जाणारी कार दुभाजकावर धडकल्याने अपघात झाला, मुर्तिजापूर वरून अकोला येथे जाणारी कार क्रमांक एम.एच-28, ए. झेड -6536 महामार्गाच्या दुभाजकाला धडकल्याने सोमवारी 21 एप्रिलच्या सायंकाळी 7.15 वाजता दरम्यान अपघात घडला. यात वाहनातील दोघे जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच चण्डिका माता आपत्कालीन पथकाच्या सदस्यांनी तातडीने जखमींना कार बाहेर काढून त्यांना रुग्णालयात हलवले.दुसऱ्या घटनेत कुरणखेड येथील नवीन वस्ती नजिक अनोळखी इसमास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झाला, त्याला माता चंडिका आपत्कालीन बचाव पथकाच्या सदस्यांनी महामार्गावर तैनात असलेल्या रूग्णवाहिकेच्या मदतीने अकोला येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेले, परंतु अशोक वाटिका दरम्यान इसमाचा मृत्य झाला.

हा अपघातही सोमवारी 21 एप्रिलच्या सांयकाळी 7.30 च्या दरम्यान घडला आहे. विशेष म्हणजे दोन्ही अपघात 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने घडले आहेत. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. अपघात टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.तिसऱ्या अपघातात रात्री 11 वाजताच्या दरम्यान दोन दुचाकीमध्ये जोरदार धडक झाल्याने, दोन्ही दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले, यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय सूत्रांची माहिती आहे.दुसरीकडे, कोकणात दापोली- खेर्डी सीएनजी पंप जवळ 17 सीटर गाडीचा अपघात झाला. मुंबईतून उंबर्ले येथे पूजे करीता येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला मोठा अपघात झाला. अपघातात २ जण गंभीर व ५ जण किरकोळ जखमी झाले असून, सर्वांना अधिक उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.