मुंबईची हवा मर्यादेहून अधिक प्रदूषित, उन्हाळ्यातही गंभीर स्वरुप; कारणं काय.

मुंबईत उन्हाळ्यातही हवेची गुणवत्ता खराब असून ती मर्यादेहून अधिक प्रदूषित आहे. प्रदूषकाचे प्रमाण गंभीर असून ‘पीएम १०’ची प्रदूषण पातळी सातत्याने वाढते आहे.उन्हाळ्यामध्ये हवा तापल्याने हलकी होते आणि वर जाते. यामुळे हवेतील प्रदूषके साचून राहत नाहीत. मात्र मुंबईमध्ये सर्वांत घातक असलेल्या ‘पीएम १०’ या प्रदूषकाचे प्रमाण वर्षभर सुरक्षित मर्यादेपेक्षा अधिक असून, उन्हाळ्यातही ते गंभीर स्वरूपाचे असल्याचे समोर आले आहे. ‘रेस्पायरर लिव्हिंग सायन्सेस’च्या चार वर्षांच्या अभ्यासावरून ही माहिती समोर आली आहे. हा अभ्यास अॅटलास एक्यू येथे उपलब्ध असलेल्या ‘पीएम १०’च्या आकड्यांवर आधारलेला आहे.मुंबईमध्ये ‘पीएम १०’ची प्रदूषण पातळी सातत्याने राष्ट्रीय सुरक्षित मर्यादा ६० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपेक्षा अधिक होती. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातही हीच स्थिती असल्याचे दिसून आले.

गेल्या चार वर्षांमध्ये २०२१ ते २०२४ या कालावधीत या प्रदूषकाची मुंबईतील पातळी अनुक्रमे १०९.३ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर, ११९.७ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर, ११८.६ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि ९० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होती.सन २०२४मध्ये ‘पीएम १०’च्या प्रमाणामध्ये घट झाल्याचे दिसले तर प्रत्येक वर्षी ही पातळी सुरक्षित मर्यादेहून अधिक होती. या प्रदूषकाचे सरासरी प्रमाण या चारही वर्षांमध्ये एकदाही राष्ट्रीय मानकांहून कमी नव्हते.‘पीएम १०’च्या सरासरी पातळीसोबत मुंबईतील काही ठिकाणी हे प्रमाण अधिक तीव्र होते. सन २०२४ मध्ये मालाड पश्चिम येथे हे प्रमाण १५४.५ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर नोंदले गेले. ते गेल्या वर्षाच्या तुलनेत ५० टक्के जास्त होते. शिवाजीनगर येथे सन २०२१ मध्ये २११ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर, तर सन २०२४ मध्ये १०२ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर ‘पीएम १०’ची नोंद झाली.

वरळीतील सिद्धार्थनगर येथे २०२१ येथे ते ५७.१ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होते. त्यानंतर सन २०२३ मध्ये ही पातळी ११९.२ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत वाढली. सन २०२४ मध्ये १०५.१ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर असे ‘पीएम १०’चे प्रमाण होते. चकाला-अंधेरी पूर्व, कुर्ला, देवनार, विलेपार्ले पश्चिम आणि माझगाव येथे दरवर्षी सुरक्षित मर्यादेचे उल्लंघन झाले.मुंबईमध्ये कोणत्याही ऋतूमध्ये प्रदूषणाचा त्रास होऊ शकतो, हे या आकड्यांवरून समोर आले. यासाठी शहराचे नियोजन, पायाभूत सुविधा सुधारणे, नियमांची कडक अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत ‘रेस्पावरर लिव्हिंग सायन्सेस’ चे संस्थापक रौनक सुटारिया यांनी व्यक्त केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.