अतिरक्तस्रावामुळे एनएमएमसी रुग्णालयात बाळंतिणीचा मृत्यू, रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचा कुटुंबीयांचा आरोप.

कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, प्रसूतीनंतर लगेचच महिलेला जास्त रक्तस्त्राव होऊ लागला. इतका रक्तस्त्राव होत असतानाही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई केली नाही. जेव्हा तपासणीसाठी रक्त घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे आढळून आले की तिच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाले होते. सायंकाळी ६ वाजता तिला रुग्णालयात नेण्यात आले आणि रात्री ८.३० वाजता तिने एका बाळाला जन्म दिला.नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) रुग्णालयात एका ३२ वर्षीय गर्भवती महिलेचा बाळंतपणानंतर अवघ्या दोन तासांतच दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. संगीता खरात असे मृत महिलेचे नाव आहे. महिलेच्या कुटुंबियांनी या मृत्यूसाठी महापालिका रुग्णालयाला जबाबदार धरले आहे.कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, प्रसूतीनंतर लगेचच महिलेला जास्त रक्तस्त्राव होऊ लागला. इतका रक्तस्त्राव होत असतानाही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई केली नाही.

जेव्हा तपासणीसाठी रक्त घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे आढळून आले की तिच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाले होते. सायंकाळी ६ वाजता तिला रुग्णालयात नेण्यात आले आणि रात्री ८.३० वाजता तिने एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिच्या सामान्य प्रसूतीनंतर तिला टाके देण्यात आले आणि आम्हाला संशय आहे की टाके देताना काहीतरी चूक झाली ज्यामुळे रक्तस्त्राव झाला, असे संगिताच्या भावाने पुढे सांगितले.कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, NMMC रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीसाठी रक्त घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना तिची प्रकृती कळली. पण अतीरक्तस्त्राव झाल्याने आणि हृदयविकाराचा झटका आल्याने तिला तातडीने आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला फोर्टीस रुग्णालयात रेफर करण्यात आले. शनिवारी तिच्यावर शस्त्रक्रिया होणार होती परंतु त्यापुर्वीच तिचा मृत्यू झाला, असे संगिताच्या भावाने सांगितले.

वाशी NMMC रुग्णालयातील डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत, संगिताच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. “आम्ही शवविच्छेदन अहवाल आणि काही निष्काळजीपणा झाला आहे का हे तपासण्यासाठी तज्ञांच्या मताची वाट पाहत आहोत.” असे वाशी पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.संगिता खरात सानपाडा येथील एका ऑफिसमध्ये काम करत होती जिथे ती आणि तिचा भाऊ आरटीओशी संबंधित कामे करतात. दरम्यान, तिचा नवरा अग्निसुरक्षेच्या क्षेत्रात एका खाजगी कंपनीत कामाला आहे. आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. त्यापूर्वीच तीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.