पर्यटकांनो, मधमाश्यांपासून सावध राहा! ट्रेकिंगवेळी नसते उद्योग नको, ३ महिन्यांत दीडशे पर्यटक जखमी.

गेल्या तीन महिन्यांत मधमाश्यांच्या हल्ल्यांच्या वीसहून अधिक घटना घडल्या असून, दोन जणांचा मृत्यू आणि दीडशेहून अधिक पर्यटक जखमी झाले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये गडकिल्ल्यांवर, रानावनात भटकंतीला गेलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांचे हल्ले याही वर्षी वाढले आहेत. गेल्या तीन महिन्यांत मधमाश्यांच्या हल्ल्यांच्या वीसहून अधिक घटना घडल्या असून, दोन जणांचा मृत्यू आणि दीडशेहून अधिक पर्यटक जखमी झाले आहेत.भटकंतीच्या वेळी मधमाश्यांनी केलेले हल्ले पर्यटकांच्या जीवावर बतले आहेत. उन्हाळ्यामध्ये उष्माघाताने पर्यटक, किल्लाप्रेमींना त्रास झाल्याच्या घटना दर वर्षी पुढे येतात. त्यात आता मधमाश्यांच्या हल्ल्यांची भर पडली आहे. रानावनात लागणाऱ्या वणव्यांमुळे; तसेच पर्यटकांच्या उपद्रवामुळे मधमाश्यांकडून होणारे हल्ले वाढले आहेत. दर वर्षी यात वाढ होते आहेत. मधमाश्यांनी पाठलाग केल्यास घाबरून धावपळ न करता, अंगाभोवती कापड, चादर लपेटून घ्यावी.भटकंतीला जाताना उग्र वासाचे परफ्युम, सुगंधी द्रव्यांवा वापर टाळावा मधमाश्यांचे पोळे असलेल्या भागांत सिगारेट ओढणे कटाक्षाने टाळावेमधमाश्यांच्या परिसरात चूल पेटवून स्वयंपाक, गोंगाट टाळावा.अलीकडे मधमाश्या आणि इतर कीटकांच्या हल्ल्यांपासून बचाव करणारे काही स्प्रे, क्रीम उपलब्ध झाले आहेत, डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांचा वापर करावा.

हल्ले का होत आहेत?उन्हाळ्यात मधमाश्या आक्रमक होताबहुतांश पोळी ही शांत परिसरात असतात, गर्दी, मोठा गोंगाटामुळे त्या आक्रमक होतातसुगंधी द्रव्य, अत्तर, डिओडूंटमुळे मधमाश्या पाठलाग करतातमधमाश्यांना दगड मारून डिवचणेपोळ्याजवळ शेकोटी, चूल पेटवणेपळ्याजवळ सिगारेट ओढल्यानेजवळ जाऊन सेल्फी स्टिकने फोटो काढणअतिधाडस बेतते जीवावरमाहितगाराशिवाय गिर्यारोहणाला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी, याचे प्रशिक्षण अनेकांना नसते. त्यामुळे पावसाळ्यातही गडकिल्ल्यांवर, घनदाट जंगलात वाट चुकणे, धबधब्यांमधून वाहून जाणे, असे अपघात वाढले आहेत. यात आता मधमाश्यांच्या हल्ल्यांची भर पडली आहे. हल्ला झाल्यास काय करावे, याची माहिती नसल्याने पर्यटक पळत सुटतात आणि हल्ल्याची व्याप्ती अधिक वाढत जाते.गेल्या तीन महिन्यांत नोंदवलेल्या घटनाशिवनेरी किल्ल्यावर महिनाभरात तीन वेळा पर्यटकांवर हल्ले.कर्नाळा किल्ल्याच्या मार्गावर झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू, दोन पर्यटक गंभीर जखमीअकोला-बार्शीटाकळी येथे झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यूकोल्हापूर-कुरूंदवाड येथे मधमाश्यांच्या डंखामुळे पाच जण जखमी.पांडवगडावर मधमाश्यांच्या हल्ल्यामध्ये सहाजण गंभीर जखमी.एकवीरा देवीच्या मंदिर परिसरात भाविकांवर मधमाश्यांचा हल्ला नंदुरबार येथील आदिवासी आश्रमशाळेत १३ विद्यार्थी जखमीसिंहगडावर मधमाश्यांच्या हल्ल्यात २० पर्यटक जखमीअंजिठा लेणी येथील हल्ल्यात

१० पर्यटक जखमीचंद्रपूर येथील हल्ल्यात तीन बकऱ्यांचा मृत्यू, १५ बकऱ्या जखमी निर्मनुष्य ठिकाणी मधमाश्यांची पोळी शहराबाहेर, गावांबाहेर असलेल्या मोठ्या ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ल्यांवरील बांधकामे, बुरूज-कमानींच्या खालील गारवा असलेल्या भागात, लेण्यांमध्ये वर्षानुवर्षे मधमाश्यांची मोठी पोळी आहेत. गावांबाहेरील प्राचीन मंदिरांच्या आवारात शांतता असलेल्या ठिकाणीही पोळी बघायला मिळतात. एखादा अपवाद वगळता, मधमाश्या स्वतःहून हल्ला करत नाहीत, त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यासच त्या आक्रमक होतात, असे अभ्यासक सांगत आहेत. सध्या होत असलेल्या हल्ल्यांमागे पर्यटकांची चूक किंवा अथवा धाडस त्यांच्यावर बेतल्याचे स्पष्ट झाले आहे.उन्हाळ्यात मधमाश्या आक्रमक असतात. पर्यटक अनेकदा त्यांची पोळी असलेल्या भागात गोंगाट करतात. पोळ्याजवळ सिगारेट ओढतात. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर अतिधाडस टाळण्याचे भान पर्यटकांनी राखले पाहिजे. सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांवर, जुन्या मंदिरांमध्ये वर्षानुवर्षे मधमाश्यांची पोळी आहेत. पूर्वी या हल्ल्यांचे प्रमाण अत्यल्प होते. अलीकडे या घटना वाढण्यामागे पर्यटकांचा उपद्रव हे कारण आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.