ग्रामपंचायत कार्यालयातच होणार होता बालविवाह, पोलिसांना टीप लागली, अन्… बारामतीत खळबळ .

बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे पोलिसांनी एका बालविवाह रोखला. तेरा वर्षीय मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी नववधू आणि नवरदेवाच्या आई-वडिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ग्रामपंचायतची परवानगी न घेता विवाह आयोजित करण्यात आला होता. सहाय्यक निरीक्षक सचिन लोखंडे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई केली.बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे तेरा वर्षाच्या मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. या प्रकरणात पोलिसांनी नवरा नवरीच्या आई-वडिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला. यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी,

20 एप्रिल 2025 रोजी माळेगाव खुर्द गावातील विशिष्ट समाजातील कुटुंबांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतची परवानगी न घेता ग्रामपंचायतीच्या सभागृहात लग्न आयोजित केले होते. खंडाळा तालुक्यातील वर आणि माळेगाव खुर्द मधील वधू असा हा विवाह होणार होता.माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन लोखंडे यांना वधू अल्पवयीन असून होणारा विवाह सोहळा हा बालविवाह सोहळा असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी त्यांचे पोलीस पथक या ठिकाणी पाठवले, खातर जमा केल्यानंतर मुलगी तेरा वर्षे आठ महिने वयाची निघाली.

त्यामुळे वधू वर पक्षांना घेऊन पोलिसांचे पथक माळेगाव पोलीस ठाण्यात पोचले.या ठिकाणी रितसर चौकशी करून पोलिसांनी पाच जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी माळेगावचे ग्रामसेवक इम्तियाज इनामदार यांनी फिर्यादी दिली. त्यावरून माळेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3 (5) सह बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 चे कलम 9, 10 प्रमाणे नवरी मुलीचे वडील राजेश अजगर भोसले, नवरीची आई सौ.वारणा राजेश भोसले (दोघेही रा.माळेगाव खुर्द ता.बारामती जि.पुणे), नवरदेव राहुल भानुदास शिंदे, नवरदेवाचे वडील भानुदास मायाजी शिंदे व नवरदेवाची आई रुपाली भानुदास शिंदे (सर्व रा. पिपरी ता. खंडाळा जि. सातारा) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.