बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे एका ढाबा मालकावर आणि त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाला, ज्यात मालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बिलाच्या कारणावरून झालेल्या वादातून आनंदगाव येथील काही ग्राहकांनी हे कृत्य केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.बीडच्या माजलगावमध्ये ढाबा मालक आणि त्याच्या मुलावर प्राण घातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार रात्री उघडकीस आला होता. यात गंभीर जखमी असलेल्या बाप लेकावर उपचार सुरू होते यात महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. डोक्यामध्ये गंभीर दुखापत असल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
माजलगाव शहरापासून ४ किमी अंतरावर नागडगाव पाटी कॉनर्रवरील गावरान ढाबा मालक महादेव गायकवाड (५४ वर्षे) रा. मंजरथ रोड माजलगाव यांच्या काल संध्याकाळी ७.३० ढाब्यावर बसलेल्या माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील ग्राहकांनी बिलाच्या कारणाने डोक्यावर वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ढाबा मालक महादेव गायकवाड व मुलगा आशुतोष महादेव गायकवाड गंभीर जखमी झाले होते. महादेव गायकवाड यांना संभाजीनगर येथे उपचाराठी हलवण्यात होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे प्राणज्योत मालवली. तर मुलगा आशुतोष महादेव गायकवाड याच्यावर उपचार सुरू असून माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.हॉटेलमध्ये आरोपी आले जेवले आणि त्यानंतर त्यांनी बिलाच्या कारणावरून थेट हॉटेल मालकाला मारहाण केली.









