दादर स्थानकातून प्रवास करत असाल तर ही बातमी एकदा वाचाच, प्रवाशांसाठी रेल्वेकडून महत्त्वाची माहिती.

दादर स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दादर स्थानकातील पुलाबाबत रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे.मध्य तसंच पश्चिम रेल्वेवरील दादर हे मध्यवर्ती स्थानक आहे. दोन्ही उपनगरीय स्थानकातून दादरमध्ये येणाऱ्या – जाणाऱ्या प्रवाशांनी तुफान गर्दी असते. या गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत स्थानकावर अनेक बदल करण्यात आले. प्लॅटफॉर्मची रुंदी, तसंच कर्जतकडे येणाऱ्या लाइवरवर दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म, एक्स्कलेटर अशा अनेक गोष्टी नव्याने दादर स्थानकात करण्यात आल्या. याच दादर स्थानकाबाबत आता पुन्हा एकदा महत्त्वाची माहिती समोर आली आहे.दादर स्थानकातील पश्चिम रेल्वे मार्गाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ बाबत महत्त्वाची माहिती आहे.

पश्चिम रेल्वेच्या ४ नंबर प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पादचारी पुलाचं काम रेल्वेकडून हाती घेण्यात आलं आहे. या कामामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील पादचारी पुलाच्या पायऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. एप्रिलच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत या पुलाच्या पायऱ्या बंद असणार आहेत.पश्चिम रेल्वेच्या ४ नंबर प्लॅटफॉर्मवरील पादचारी पुलाच्या पायऱ्या ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. प्रवाशांनी पर्यायी व्यवस्थेचा वापर करण्याच्या सूचना पश्चिम रेल्वेकडून देण्यात आल्या आहेत.रेल्वेने अधिकृत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीचं काम सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील उत्तरेकडील पायऱ्या तात्पुरत्या बंद करण्यात येत आहेत.

यामुळे प्रवाशांना काही गैरसोय होऊ शकते, परंतु हे काम त्यांच्या सुरक्षितता आणि सुविधा सुधारण्यासाठी केलं जात आहे. या पायऱ्या बंद असताना प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचंही सांगण्यात आलं आहे.दरम्यान, दादर पश्चिमेकडील प्लॅटफॉर्मसह गोरेगाव स्थानकातही पादचारी पूल बंद ठेवण्यात आला आहे. पादचारी पुलाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. त्याच्या तोडकामासाठी पूल बंद करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२५ पर्यंत पुलाचं काम पूर्णत्वास येईल, तोपर्यंत पूल बंद ठेवला जाणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.