मुंबई महापालिकेच्या कारवाईचा देशभरातील जैन समुदायाकडून निषेध, विलेपार्लेमध्ये सर्व पक्षीय निषेध रॅली, प्रकरण काय.

मुंबई महानगरपालिकेने हे मंदिर पाडल्यानंतर, आज सर्व पक्षांचे नेत्यांनी या कारवाईविरुद्ध मोर्चा काढला. या प्रकरणी पुढे काय करायचे याचा निर्णयही घेतला जाणार आहे. बीएमसीच्या कारवाईनंतर जैन समाजात प्रचंड संताप आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात जैन समाजाकडून करण्यात येत आहे.मुंबईच्या विलेपार्ले येथील कांबळीवाडी येथील ९० वर्षे जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर बुधवारी मुंबई महानगरपालिकेने पाडले. या घटनेमुळे देशभरात जैन समुदाय संतप्त झाला आहे. मंदिर पाडण्याच्या विरोधात आज(१९ एप्रिल) सकाळी ९:३० वाजता अहिंसक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी आणि जैन समाजाचे संत सहभागी झाले.मुंबई महानगरपालिकेने हे मंदिर पाडल्यानंतर, आज सर्व पक्षांचे नेत्यांनी या कारवाईविरुद्ध मोर्चा काढला. या प्रकरणी पुढे काय करायचे याचा निर्णयही घेतला जाणार आहे. बीएमसीच्या कारवाईनंतर जैन समाजात प्रचंड संताप आहे.

या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात जैन समाजाकडून करण्यात येत आहे.केंद्रात भाजपा आणि महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आहे. मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला आहे, त्यानंतर सध्या त्याची जबाबदारी सरकारकडे आहे. मंदिर पाडण्याबाबत बीएमसीने व्यवस्थापन समितीला Notice बजावली होती. या विरोधात जैन समाजाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी होणार होती, परंतु त्याआधी बुधवारी BMCच्या पथकाकडून मंदिर पाडण्यात आले.जैन समाजाच्या वतीने असे म्हटले आहे की, न्यायालयाच्या निर्णयानंतर BMC प्रशासनाने कारवाई करायला हवी होती.

मंदिराचे विश्वस्त अनिल शाह म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले की, आम्ही उच्च न्यायालयात अपील दाखल केली आहे हे BMC ला माहित होते, परंतु BMC प्रशासनाने घाईघाईने मंदिर पाडले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जैन समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले की, आम्ही अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या निर्णयापर्यंत वाट पाहण्याची विनंती केली होती, परंतु त्यांनी आमचे ऐकले नाही. अनिल शाह म्हणाले की, जैन बांधव आज मंदिर पाडण्याच्या विरोधात अहिंसक निषेध करतील. या निषेधापूर्वी, जैन बांधवांनी ज्या मंदिरात ही कारवाई करण्यात आली होती तिथे आरती केली. याशिवाय, हे मंदिर कोणाच्या आदेशाने पाडण्यात आले असा प्रश्न जैन बांधवांनी विचारला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.