जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही मोटर सायकल चोरट्याला अटक.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही मोटर सायकल चोरट्याला अटक

जळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमी मिळाली की, वरणगाव येथील जाबीर शहा भिकन शहा हा त्याचे साथीदार सह मोटार सायकल चोरी करून त्या कमी पैश्यामध्ये विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी  दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, पोह सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, भारत पाटील, दिपक चौधरी सर्व नेम.स्थागुशा जळगाव अशांचे पथक तयार करून तात्काळ जाबीर शहा यांची माहिती घेवुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

त्यावरून नमुद पथक हे साधारण ३ दिवसापासून जाबीर शहा याचेवर पाळत ठेवून असतांना आज दिनांक २८/०८/२०२४ रोजी वरणगाव शहरातील तिरंगा चौकातून ताब्यात घेवून त्याचे कडून १) मुक्ताईनगर पो.स्टे सीसीटीएनएस गु.र.नं. २४१/२०२४ भादंवि क. ३७९ मधील हिरो कंपनीची एचएफ डिलक्स आरटीओ क्र. एमएच १९ डीजे ७४१२, २) मलकापुर शहर पो.स्टे सीसीटीएनएस गु.र.नं. २९२/२०२४ भादंवि क. ३७९ मधिल होन्डा कंपनीची ॲक्टिवा पांढऱ्या रंगाची आरटीओ क्र. एमएच २८ एएक्स ११४१, ३) मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुर जिल्ह्यातील खकनार पो.स्टे गु.र.नं. ५१८/२०२४ भा.न्या.सं.३०३ (२) मधिल रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट लाल व काळया रंगाची आरटीओ क्र. एमपी ६८ एमजी ९६३८, ४) होन्डा कंपनीची यूनिकॉर्न ग्रे रंगाची आरटीओ क्र. एमएच १२ क्यूबी ०३२७ अश्या एकुण १,५५,०००/- रु. किं.च्या ४ मोटार सायकल जप्त करून पुढील योग्य त्या कारवाई करीता मुक्ताईनगर पो.स्टे सीसीटीएनएस गु.र.नं. २४१/२०२४ भादंवि क.३७९ या गुन्ह्यात मुक्ताईनगर पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्ह्याची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव, राजकुमार शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर भाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.