गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, धावत्या वाहनातच व्हायची चाचणी, बुलढाणा हादरलं.

बेकायदा गर्भलिंग निदान करून गर्भपात करणारी टोळी बुलढाण्यासह लगतच्या हिंगोली जिल्ह्यात सक्रिय आहे. त्यामुळे बुलढाण्याचा पीसीपीएनडीटी विभाग दक्ष झाला आहे.वाशीम जिल्ह्यातून महिलेस गर्भलिंग निदानासाठी कारमध्ये घेऊन डोणगाव शिवारात येत येणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील एका एजंटला बुलढाण्यातील पीसीपीएनडीटीच्या पथकाने पाठलाग करून पकडले. मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख शिवारात गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने गर्भलिंग निदानाचे रॅकेट असल्याचे उघड झाले आहे.गजानन विठ्ठल वैद्य (वय ३८) असे आरोपीचे नाव असून, तो हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्याच्या माझोडचा रहिवासी आहे. मेहकर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता हिवसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून डोणगाव पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हे नोंदवून त्याला अटक केली.

बेकायदा गर्भलिंग निदान करून गर्भपात करणारी टोळी बुलढाण्यासह लगतच्या हिंगोली जिल्ह्यात सक्रिय आहे. त्यामुळे बुलढाण्याचा पीसीपीएनडीटी विभाग दक्ष झाला आहे. दरम्यान, या गर्भलिंग निदानासंदर्भात माहिती समजताच सापळा रचण्यात आला. त्यासाठी डमी महिला तयार करण्यात आली.आरोपी गजानन वैद्य याने वाशीम जिल्ह्यातील कुकसा फाट्यावरून एमएच-४९-एएस-६९६६ क्रमांकाच्या गाडीमध्ये महिलेस बसवून डोणगावकडे निघाला. मात्र, मध्येच पथक मागावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने वाहन शेलगाव देशमुख मार्गाने वळविले. अखेर पाठलाग करून त्याला पकडण्यात आले.

इकडे डोणगाव पोलिस डोणगाव-मालेगाव रस्त्यावर नाकाबंदी करून बसले होते. नंतर पोलिस शेलगाव शिवारात दाखल झाले. वाहनाची झडती घेतली असता चार सेफ्टी ग्लोव्हज, पाच नग ब्लड कलेक्शन बॉटल, सीरिंज असे साहित्य आढळून आले.आरोपी गजानन वैद्य याने मी डॉक्टर असून गर्भपात करतो. दुसरे डॉक्टर येऊन गर्भलिंग निदान करतील व नंतर मी गर्भपात करेल, असे सांगून त्याने महिलेजवळून २८ हजार रुपये घेतले होते. गर्भलिंग निदान व गर्भपात करवून देणाऱ्या एजंटचे मेहकर तालुक्यातील काही डॉक्टरांशी कनेक्शन असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने तपास केला जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.