उपसरपंचाने जबरदस्तीने केला तरुणीचा गर्भपात, नांदेड जिल्ह्यातील घटना.

नांदेड जिल्ह्यात तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. दुसरीकडे, भोकर शहरात अल्पवयीन मुलीला फसवून पळवून नेणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.मुखेड येथे एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने गर्भपात केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथे एका उपसरपंचाने गावातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून फसवले होते. दोन वेळा गर्भपात करून आरोपीने हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या तरुणीने तामसा पोलिस ठाणे गाठल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मुखेड तालुक्यातील जाहुर येथे सुनील हनुमंत बोडखे (वय २६) या युवकाने लग्नाचे आमिष दाखवून गावातील मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित मुलीस धमकी देऊन लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात गर्भपात करण्यास भाग पाडले. २७ एप्रिल २०२३ ते १६ एप्रिल २०२५ दरम्यान हे प्रकरण सुरूच राहिले. पोनि लक्ष्मण केंद्रे अधिक तपास करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक झाली की नाही, हे समजू शकले नाही.दरम्यान नांदेडच्या भोकर शहरातल्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या तिघांविरुद्ध भोकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

मुख्य आरोपी मात्र, अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. भोकर शहरातल्या गांधीनगर परिसरातील अश्विन जाधव, विशाल कावळे व त्याच्या एका साथिदाराने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. ज्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली.गुरुवारी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. शिवाय त्या मुलीची मुक्तता केली. उपसरपंचाने गावातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून फसवले आणि दोन वेळा गर्भपात केल्याने खळबळ निर्माण झाली. त्यानंतर मुलीने थेट आता उपसरपंचाच्याविरोधात तक्रार दिली. मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ होताना दिसतंय.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.