माय-लेक रिक्षातून उतरले, तेवढ्यात मागून भरधाव ट्रक आला आणि… आईच्या डोळ्यासमोर चिमुकल्याचा अंत.

नागपुरात आईच्या डोळ्यासमोर चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.नागपूरच्या हिंगणा नाका परिसरात शुक्रवारी घडलेल्या एका भीषण अपघातात चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आईसमोरच तिच्या सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ट्यूशन क्लासवरुन परतत असताना हा अपघात घडला. ट्रकच्या चाकाखाली सापडल्यामुळे अहान सूरज नायक (वय ७) या मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला, मात्र काही वेळातच त्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.मिळालेल्या माहितीनुसार, तुलसी सूरज नायक ही महिला त्यांचा मुलगा अहान (वय ७) आणि मुलगी स्नेहा (वय ९) यांच्यासोबत रामदासपेठमधील ट्यूशन क्लासहून ऑटोने घरी परतत होत्या. सायंकाळी साधारण चारच्या सुमारास त्या हिंगणा नाका टी-पॉईंटजवळ देशमुख ट्रेडिंग कंपनीसमोर ऑटोतून उतरल्या.

त्या ऑटोचालकाला पैसे देत असतानाच अचानक हिंगण्याकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने (ट्रक क्रमांक एमएच ४०/ सीआर ५१००) अहानला धडक दिली. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने अहानला धडक देत फरफटत नेलं.अपघात इतका भीषण होता की अहान ट्रकच्या पुढच्या चाकाखाली आला. ट्रकने अहानला देशमुख ट्रेडिंगपासून शांतनू ट्रेडिंगपर्यंत लांबपर्यंत फरफटत नेलं. अपघातात तुलसी नायक यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून, परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत करत लता मंगेशकर रुग्णालयात अहानला दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं.घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेश चौहान, पोलीस निरीक्षक संजय बनसोडे आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

नागरिकांनी दिलेल्या वाहन क्रमांकाच्या आधारे ट्रक काही अंतरावर जप्त करण्यात आला आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले.हिंगणा रोडवरील वेगाने धावणारी वाहने आणि आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा स्पीड ब्रेकरची मागणी केली आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा दुर्घटना वाढत आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.