वाटसरूंना अडवून लुटणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, बारामतीत सराईत टोळी जेरबंद.

बारामती तालुका पोलिसांनी रात्रीच्या वेळी वाटसरूंना लुटणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद केले आहे. एमआयडीसी, भिगवण रोड परिसरात जबरी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. पोलिसांनी अरबाज शेख, अविनाश लोंढे, समाधान खंडागळे आणि रोहित पवार यांना अटक केली आहे. आणखी एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.रात्रीच्या वेळी वाटसरूंना अडवून त्यांना मारहाण करून मोबाईल, रोख रक्कम जबरीने चोरून नेणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी, भिगवण रोड, सिटीइन चौक, बारामती क्लब या परिसरात जबरी चोरीच्या घटना सातत्याने घडताना दिसल्या.या प्रकरणी अरबाज उर्फ बबलू हैदर शेख (वय २४ वर्ष, रा. खंडोबानगर बारामती)

अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय १९ वर्ष रा.मळद भोंगळे वस्ती बारामती) समाधान दत्तात्रय खंडागळे वय १९ वर्ष, रोहित विठ्ठल पवार वय,१९ वर्ष (दोघे रा. दादा पाटील नगर तांदुळवाडी, बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांच्या तपास पथकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र, म्हणाले तसे धागेदोरे हाती लागली नाहीत.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः

लक्ष घालून दोन पथकांसह तपास करून एमआयडीसी, भिगवण रोड, सिटीइन चौक येथील गुन्ह्यातील अरबाज उर्फ बबलू शेख, अविनाश उर्फ माऊली लोंढे यांना अटक केली. सदर गुन्ह्यात निलेश गोरे (रा. खंडोबा नगर बारामती) याचाही सहभाग असून तो सध्या फरार आहे.तर बारामती क्लब येथील गुन्ह्यात समाधान खंडागळे, रोहित पवार यांना अटक केली असून या गुन्ह्यात आणखी एक आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील १० दिवसात वाटसरूंना रात्रीच्या वेळी अडवून मारहाण करत मोबाईल व रोख रक्कम चोरून नेल्याचे गुन्हे दाखल होते. सदर गुन्हे स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने उघडकीस आणले असून, आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे.अशी माहिती अप्पर पोलीस गणेश बिरादार यांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.