मुंबईकरांचा खोळंबा! मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? पाहा Timetable

ब्लॉकवेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि ठाणे ते वाशी/नेरूळ या दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मरीन लाइन्स या दरम्यान ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकवेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.परिणाम : ब्लॉक वेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. फलाट उपलब्ध नसल्याने करी रोड, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि मशिद स्थानकांवर लोकल उपलब्ध राहणार नाही. यामुळे काही फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.परिणाम – ठाणे ते वाशी / नेरूळ / पनवेल मार्गावरील अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नसल्याने या मार्गावरील लोकल वेळापत्रकानुसार धावणार आहेत.चर्चगेट ते मरीन लाइन्सदरम्यान वानखेडे पादचारी पुलाचा दक्षिण दिशेचा गर्डर उभारण्यासाठी शनिवारी १९ एप्रिलला मध्यरात्री १.१५ ते रविवारी पहाटे ४.१५पर्यंत पश्चिम रेल्वेने विशेष रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी रात्री ८.५०ची बोरिवली-चर्चगेट आणि रविवारी पहाटे ४.३८ची चर्चगेट-बोरिवली लोकल रद्द राहणार आहेत. काही लोकल फेऱ्या अंशत: रद्द राहणार आहेत.मध्य रेल्वेवर दिवा आणि मुंब्रा दरम्यान रेल्वे विद्युतीकरणासंबंधी तांत्रिक कामे करण्यासाठी दोन दिवस रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

रविवारी मध्यरात्रीनंतर १ ते सोमवारी पहाटे ५ आणि मंगळवारी मध्यरात्रीनंतर १ तेबुधवारी पहाटे ५ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.रात्रकालीन ब्लॉकमुळे दोन्ही दिवस गाडी क्रमांक १५१८१ मऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस सुमारे २५ मिनिटे विलंबाने धावणार आहे. गाडी क्रमांक ११०२० वाराणसी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुमारे १५ मिनिटे विलंबाने धावेल. ब्लॉकवेळेत दिवा आणि ठाणे दरम्यान सहाव्या मार्गावर काही अप मेल गाड्या धावणार आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.