आरसीबी संघासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियम ‘साडेसाती’? मोठी अडचण, जाणून घ्या कारण.

आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला अद्याप जेतेपद मिळवता आले नाही. यंदाच्या हंगामातही आरसीबीला घरच्या मैदानावर पराभवांचा सामना करावा लागत आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर सर्वाधिक ४६ सामने आतापर्यंत संघाने हारले आहेत. यावर्षी त्यांनी बाहेरच्या मैदानावर चांगली कामगिरी केली आहे.आयपीएलची क्रेझ सध्या लोकांमध्ये बघायला मिळतंय. आयपीएल २०२५ ला धमाकेदार पद्धतीने सुरूवात झालीये. आयपीएलचे हे १७ सीजन आहे. मात्र, आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एकदाही आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवण्यात यश मिळाले नाही. फक्त तीन वेळा अंतिम फेरीत आरसीबीला प्रवेश मिळाला. विराट कोहली याला चाहते मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताना दिसतात. मात्र, विराटच्या टीमला अजून एकदाही आयपीएलमध्ये यश मिळाले नाहीये.

मुळात म्हणजे अद्याप संघाला एकदाही आयपीएल जिंकता न येण्याची अनेक कारणे आहेत.यामध्ये सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना घरच्याच मैदानात पराभवाचा सामना करावा लागतो. आयपीएलमध्ये संघ त्यांच्या घरच्या मैदानावर ७ सामने खेळतात आणि उर्वरित ७ सामने वेगवेगळ्या स्टेडियममध्ये खेळवले जातात. मुळात म्हणजे घरच्या मैदानावर चांगली कामगिरी केल्याने प्लेऑफचा मार्ग सोपा होतो. मात्र, तोच मोठा फटका गेल्या काही वर्षांपासून आरसीबीला बसतोय. त्यांना घरच्याच मैदानावर संघर्ष करावा लागतोय.आरसीबी संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ४६ पराभवांना सामोरे जावे लागले आहे. हा आयपीएल लीगच्या इतिहासात घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने हरणारा संघ आहे.

आरसीबीने चिन्नास्वामी स्टेडियमवर ४३ विजय मिळवले आहेत. आरसीबीने या हंगामात आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. त्यामधील संघाला तीन पराभव आणि चार विजय मिळाले आहेत.विशेष म्हणजे आरसीबीने विरोधी संघांच्या मैदानावर चारही सामन्यात विजय मिळवला आहे तर घरचे मैदान एम चिन्नास्वामी स्टेडियम झालेल्या तिन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना हा करावा लागलाय. पंजाब किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबी घरच्या मैदानावर सर्वाधिक पराभव होणारा संघ बनलाय. आरसीबीकडे अद्याप आयपीएलचे विजेतेपद नाहीये. दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाला देखील अजून लय सापडली नसल्याचे दिसतंय. आरसीबी पुढील सामन्यात काय धमाका करते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.