अन् संग्राम थोपटे विधानसभा अध्यक्ष होता होता राहिले, उद्या करणार ‘मन की बात’, वाचा सविस्तर

पुण्यातील भोरचे काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये संधी न मिळाल्याने ते नाराज आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते लवकरच निर्णय घेणार असून, अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील भोर येथील थोपटे परिवार.. कट्टर काँग्रेस समर्थक घराणं भोर येथील सोनिया गांधींची भर पावसातील सभा. पुणे जिल्ह्यात शिक्षण सम्राट म्हणून प्रसिद्ध. 2024 च्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा कानावर येत आहेत. महाविकास आघाडीतील बडे बडे नेते भाजपच्या कंपूत विराजमान होताना पाहायला मिळतंय. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव तसेच कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी सत्तेची आस ही प्रमुख कारणे त्यामागची असू शकतात असं बोललं जात आहे.2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी आमदार असलेल्या संग्राम थोपटे यांना मात्र विधानसभा अध्यक्ष होण्याची संधी महाविकास आघाडी सरकार असलेल्या काळात चालून आलेली होती. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर संग्राम थोपटे यांचंच नाव आघाडीवर होतं मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने संग्राम थोपटे यांचं नाव राजभवनावर पाठवून सुद्धा तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी ती निवडणूकच लावू दिली नाही असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे.

हर्षवर्धन सपकाळ जरी आज तसे म्हणत असले तरी काँग्रेस मधील टोकाची गटबाजी याला कारणीभूत असल्याचं पण पडद्यामागे बोललं जातंय.विधानसभा अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी मार्फत पुढाकार घेतला जात नसल्याची नाराजी पण संग्राम थोपटे यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होती. परिणामी संग्राम थोपटे यांची वाढलेली नाराजी, विधानसभा अध्यक्ष पदासाठी संधी असून सुद्धा आलेलं अपयश आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभव संग्राम थोपटे यांना भाजपकडे खेचून घेऊन जातंय असं म्हटलं जात आहे.संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव नारायणराव थोपटे हे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री होते. भोर विधानसभा मतदारसंघातून 6 वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. अनंतराव थोपटे हे पुणे जिल्ह्यातील काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते. त्यांनी तब्बल 14 वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले.माजी आमदार असलेले संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे 1983 मध्ये वसंतदादा पाटील यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले. आमदारकीच्या दुसऱ्याच टर्ममध्ये मंत्रिपद मिळाले. दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्रशिक्षण, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज अशा अनेक खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला आहे.

अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम थोपटे हे त्याच भोर विधानसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा (2009 ते 2024) आमदार म्हणून निवडून आले आहेत. 22 मार्च 2017 रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यत्यय आणल्याबद्दल आणि चार दिवसांपूर्वी विधानसभेबाहेर अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्याबद्दल थोपटे यांना 18 इतर आमदारांसह 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आले होते. त्यानिमित्त विशेष चर्चेत असलेला चेहरा म्हणून प्रसिद्ध..पुणे जिल्ह्यात शिक्षण सम्राट म्हणूनही ख्याती असलेलं घराणं..संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पुढाकार2024 च्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर संग्राम थोपटे हे राजकीय अज्ञातवासात पाहायला मिळाले. अशातच संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा माध्यमांमध्ये झळकायला लागल्या. 11 एप्रिल 2024 रोजी विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे संग्राम अनंतराव थोपटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी जाणार होते. मात्र काही वैद्यकीय कारणामुळे ती भेट होऊ शकली नाही मात्र मी अजूनही प्रत्यक्षात भेट घेण्यासाठी इच्छुक आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं म्हणणं आहे.”माझं कुठल्याही पक्षात जाण्याचं काही ठरलेलं नाहीय. उद्या (20 एप्रिल 2025) भोर येथे आमचा राजकीय मेळावा ठरलेला आहे.. त्या मेळाव्यात मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहे. आगामी भूमिका मेळाव्यानंतरच सांगेल.”कट्टर काँग्रेस समर्थक संग्राम थोपटे हे येत्या 22 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.. यानिमित्त पुण्यातीलकाँग्रेस घराणं भाजपमय होणार असल्याच्या चर्चांना पेव सुटलेलं पाहायला मिळत आहे.. संग्राम थोपटे यांचं मन वळवण्यास हर्षवर्धन सपकाळ यांना यश येतं का हे आगामी काळच सांगणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.