जळगावात मसाज पार्लर सक्रीय : पोलिसांची कारवाई अन चार महिलांची सुटका !

शहरातील नयनतारा मार्केट मॉल येथे मसाज पार्लरच्या नावाखाली व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर एलसीबीसह जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने कारवाई केली आहे. एकूण चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ नयनतारा ऑर्किड मॉल येथे दुकान नंबर ४०८ मध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली व्यवसाय चालतो अशी माहिती एलसीबीला मिळाली होती.त्यांनी बनावट ग्राहक पाठवला.

तिथे संशयित राजू मधुजी जाट (रा.कलोधिया ता. पिंपरी जि. भीलवाडा,राजस्थान) याने बनावट ग्राहकाला व्यतिरिक्त इतर सेवा देण्यासाठी आमिष दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. छाप्यामध्ये चार महिलांच्या मार्फत पाच सेंटरच्या विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे दिसले. त्याचा मालक विक्रम राजपाल चंदमारी धानी (वय २० वर्ष रा. चत्तरगढ पत्ती जि. सिरसा, हरियाणा) हा व्यवसायाला प्रोत्साहन देत होता. म्हणून दोघांविरुद्ध पिटा ऍक्ट प्रमाणे जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मॅनेजर राजू जाट याला अटक करण्यात आली आहे. तर या महिलांना आशादीप महिला वस्तीगृहात पाठवण्यात आले आहे.

ही कारवाई ही जळगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी, सपोनी शितल कुमार नाईक, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, उपनिरीक्षक निरीक्षक महेश घायतळ, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, सुनील पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, योगेश पाटील, उपनिरीक्षक वैशाली महाजन, हेडकॉन्स्टेबल प्रियंका कोळी, मंगला तायडे, चालक दीपक चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.