आपले वसतिगृह सांस्कृतिक शैक्षणिक केंद्र बनवा– जिल्हाधिकारी आयुष प्रसाद.

आपले वसतिगृह सांस्कृतिक शैक्षणिक केंद्र बनवा-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद. – ज्या वसतिगृहात आपण शिकत आहात त्या वसतिगृहाची ओळख ही आपल्या राबवलेल्या उपक्रमातून सांस्कृतिक शैक्षणिक केंद्र बनले पाहिजे. न्याय हक्क यासाठी आंदोलन राबवले पाहिजेच, परंतु मिळत असलेल्या गोष्टीतून आपली सामाजिक, राजकीय, आर्थिक उन्नती केली पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जिल्हाधिकारी आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांसह हितगुज करताना विचार मांडले.

यावेळी ‘वेटिंग फॉर व्हिसा’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रा. संदीप केदार अनुवादित इंदाई प्रकाशनने प्रकाशित केलेल्या 500 पुस्तकांचे जैन इरिगेशन यांच्या सौजन्याने मोफत वितरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये  अरुण पवार, प्रकल्प अधिकारी यांनी वसतिगृहास देण्यात आलेल्या विविध सोयीसुविधांची माहिती दिली. सदर सोयीसुविधा उपलब्धतेकरिता आदरणीय मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री जळगाव तसेच जिल्हाधिकारी, जळगाव यांचा उत्तम सहयोग लाभल्याचे यावेळी नमूद केले.यावेळी मंचावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जैन इरिगेशनचे मिडिया विभागाचे अनिल जोशी, जिल्हा कृषि अधीक्षक कुर्बान तडवी,प्रशांत माहुरे व जावेद तडवी सहाय्यक प्रकल्प अधिकारी, प्रा. संदीप केदार, द इंडियन एक्स्प्रेसचे अनिल सोनवणे आणि बांभोरी गावाचे सरपंच बिऱ्हाडे तसेच गृहप्रमुख संतोष बच्चे व  विजय गाडे, वासुदेव बच्चे, अलंका दाभाडे, मीनाकुमारी चौधरी हे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे पारंपरिक पद्धतीने विद्यार्थी विद्यार्थिनींनी आदिवासी पेहराव आणि पारंपरिक नृत्य करत स्वागत केले. यावेळी पुस्तकाचे अनुवादक प्रा. संदीप केदार आणि जैन इरिगेशनचे मिडिया विभागाचे अनिल जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी इंदाई प्रकाशनचे देवेंद्र करकरे, वसंत राठोड, संतोष खोपडे, किशोर सोनवणे हेही उपस्थित होते.तसेच पुढे बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध प्रकारचे उपक्रम, ज्यात तुमची पकड आहे – जसे मैदानी खेळ, अभ्यास, नृत्य, व्यक्तिमत्व विकास, वकृत्व कौशल्य आदी गोष्टीत सहभाग घ्यावा असे आवाहन केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित 500 पेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींसोबत दिलखुलास चर्चा केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.