जि प उच्च प्राथमिक शाळा बोरअजंटी येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न.

जि प उच्च प्राथमिक शाळा बोरअजंटी येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न.

जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी आज दि.17/4/2025 गुरुवार रोजी आमच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरअजंटी ता.चोपडा जि.जळगाव येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय बाळासाहेब देवेंद्रजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी म्हणून आमचे लाडके सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादासाहेब  गुरुदत्तजी निंबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी सात वर्षातील त्यांचा शैक्षणिक विकास व गुणवत्तेबाबत, शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीबाबत , शिस्त व संस्काराबाबत , वर्गशिक्षिका  उज्वला पाटील ,सुनिल पाटील ,श्रीमती.सुरेखा पाटील, प्रदीप बागुल ,श्रीमती.रविना भादले तसेच मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांचे ऋण व्यक्त केले .

ऋण व्यक्त करताना विद्यार्थी भावनिक झाले होते . शाळेने दिलेले प्रेम, दिलेले संस्कार आम्ही चिरकाल टिकवून ठेवू व आमच्या गुणवत्तेत वाढ करू व यशस्वी असे नागरिक बनून शाळेला व गावाला आमचा अभिमान वाटेल असे आम्ही कार्य करू -अशी ग्वाही विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणात दिली. तदनंतर नागलवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी विद्यार्थ्यांची एक ऍक्टिव्हिटी घेऊन विद्यार्थ्यांना आपल्यातील सुप्त गुण व क्षमता ओळखून आपले जीवन उज्वल करण्यासाठी शिक्षणाचा कसा उपयोग करून घ्यावा – आपले ध्येय,आपले स्वप्न नेहमी मोठे असावे – असे त्या ऍक्टिव्हिटी मधून त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवून दिले .सर्व विद्यार्थ्यां‌‍‌‌‌‍ना माननीय केंद्रप्रमुखांकडून शैक्षणिक वस्तू भेट देण्यात आली. सेवानिवृत्त मुख्याध्यापक  निंबाळे दादा यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी व येणाऱ्या काळातील स्पर्धांविषयी विद्यार्थ्यांना जागृत करून प्रेरणा दिली व खाऊचे वाटप केले.

श्रीमती सुरेखा पाटील मॅडम व सुनिल पाटील (प्रभारी मुख्याध्यापक) यांनी विद्यार्थ्यांना यशवंत व्हा, कीर्तीवंत व्हा,गुणवंत व्हा , गावाचे,समाजाचे व शाळेचे नाव उज्वल करा अशा शुभेच्छा दिल्या ; तसेच आपल्या हातून आई-वडिलांची समाजाची सेवा कशी घडत राहील ,असे कार्य करा – अशी प्रेरणा दिली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी मिष्ठांन्नभोजन (शेव भाजी व बाजरीभाकरी,सोनपापडी, पापड, जिलेबी, लोणचे ,भात, सलाद) व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडी ताई, स्वयंपाकी ताई या सर्वांचे अनमोल असे सहकार्य लाभल्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाच्या उपस्थितीबद्दल सर्वांचे आभार .

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.