तनिषा भिसे प्रकरणात ससूनचा अहवाल, गंभीर निष्कर्ष समोर; कुटुंबियांसह रुग्णालयांवर ठपका?

भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा यांचा प्रसुतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला. जुळ्या बाळांना जन्म देऊन त्यांनी जगाचा निरोप घेतला.भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा यांचा प्रसुतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला. जुळ्या बाळांना जन्म देऊन त्यांनी जगाचा निरोप घेतला. या प्रकरणात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले. मंगेशकर रुग्णालयानं रुग्णाच्या कुटुंबाकडे १० लाख रुपयांची मागणी केली. पैसे नसतील, तर उपचार होणार नाहीत, अशी भूमिका रुग्णालयानं घेतली. त्यामुळे तनिषा यांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत, असा दावा करत भिसे कुटुंबानं केला. त्यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले. या सगळ्या प्रकरणाची चौकशी ससून रुग्णालयानं केली आहे. ससूनचा अहवाल समोर आला असून त्यात अनेक गंभीर बाबी आहेत.

ससून रुग्णालयाच्या चौकशी समितीच्या अहवालातील काही प्रमुख निष्कर्ष समोर आले आहेत.१. इंदिरा IVF मध्ये तब्येतीत सुधारणा होत नसताना देखील 4-5 दिवस दाखल करून घेणं ही चूक होती.२. तब्येतीत सुधारणा होत नसल्याचं स्पष्ट झालेलं असताना तनिषाला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करायला पाहिजे होतं.३. मंगेशकर रुग्णालयात पाच तास थांबवलं होतं. मात्र या वेळी पैसे घेतले की नाही किंवा हेच कारण होतं का? पैसे द्या नाही तर उपचार करणार नाही, असे प्रश्न होते. याबाबत आरोग्य उपसंचालकांनी चौकशी करून अहवाल द्यायचा आहे. याची चौकशी आरोग्य उपसंचालकांनी केली आहे.४ अति जोखमीची परिस्थिती असताना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती. मात्र ते करण्यात आलं नाही. तनिषा यांना सूर्या रुग्णालयात नेण्यात आलं. इथे डिलिव्हरी झाली. मात्र रुग्णालयात कोणताही कार्डिऍक स्पेशालिस्ट उपलब्ध नव्हता. तिला हार्ट अटॅकचा धोका वाढला आणि जवळपास दोन तास सीपीआर देत होते.५. सदरील रुग्णाची वैद्यकीय परिस्थिती गुंतागुंतीची होती. तनिषा यांचा मृत्यू मणिपालमध्ये झाला. हा माता मृत्यू असतानाही त्यांनी शवविच्छेदन केलं नाही. ससून रुग्णालयाला त्यांनी मृत्यू झाल्यानंतर कळवणं गरजेचं होतं. पण ते झालेलं नाही.६. या सगळ्यात IVF सेंटरची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यांनी लवकर रेफर करायला हवं होतं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.