राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त
मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करा – हॉकी जळगाव तर्फे फारुक शेख यांची मागणी
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे हॉकी जळगाव मार्फत हॉकीच्या स्पर्धा तसेच मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त खेळाडूंसाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनाच्या प्रमुख अतिथी सहाय्यक जिल्हाधिकारी (प्रशिक्षणार्थी) श्रीमती विवो तोलू केजो, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक ,हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष श्रीमती अनिता कोल्हे, सचिव फारुख शेख हे होते.

मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्काराची मागणी हॉकी जळगाव चे सचिव फारूक शेख यांनी उपस्थित खेळाडू व प्रशासकीय अधिकारी तसेच विविध खेळाचे क्रीडा संघटक मार्गदर्शक यांच्या साक्षीने मेजर ध्यानचंद यांच्या १९३६ ते १९४९ च्या क्रीडा स्पर्धेचे मागोवा सादर केला व अशा थोर हॉकी जादूगर ला भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा एकमुखी ठराव मांडला असता उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिले हा ठराव भारत सरकारला पाठवण्याचे शेख यांनी आपल्या भाषणात नमूद केले .
प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन भारतीय प्रशासन सेवेतील नागालँड येथील श्रीमती केजो या उत्कृष्ट अशा टेबल टेनिस खेळाडू असून त्यांनी नागालँड राज्या चे प्रतिनिधित्व केलेले आहे त्यांनी सर्व खेळाडूंना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देऊन खऱ्या अर्थाने हॉकी जळगाव ने क्रीडा दिन साजरा करण्याचे ठरवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व निश्चितच मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केले .
प्ले फॉर फन, फीटनेस अँड हॅपिनेस- नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी या क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंसाठी खूप सुंदर असा संदेश दिला त्यात प्ले फॉर फन, फिटनेस अँड हॅपिनेस.हे उदाहरणासह पटवून दिले.










