भारतीय संविधानाचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य होय.: अँड.रविंद्र गजरे धरणगाव तालुका प्रतिनिधी - राजु बाविस्कर, धरणगाव: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी संविधानाचे पालन हे पूर्ण आयुष्य करू असा प्रन हा प्रत्येक भारतीयाने घेतला पाहिजे तरच त्याच्या स्वप्नातील भारत आपण घडूऊ शकतो ,असे मत अँड रविंद्र गजरे यांनी व्यक्त केले.
गजरे यांनी येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात संविधान निर्मिती आणि त्यावर असलेल्या आपल्या राजकीय लढ्याचा आणि सामाजिक लढ्याचा कसा प्रभाव आहे अशा विविध पैलूंवर प्रकाश झोत टाकला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पाटील सर होते. कार्यक्रमाचे संचालन व कार्यक्रमाची प्रस्तावना किरण नेतकर यांनी मांडली. सदर कार्यक्रम प्रसंगी मातोश्री नगर ,व धरणगाव येथील रहिवासी माता-भगिनी व अबाल वृद्ध यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मातोश्री नगर येथील सर्व तरुण मंडळीने परिश्रम घेतले.









