गडकिल्ल्यांची स्वच्छता-संवर्धन, जयंत पाटील यांची धर्मवीरगडावर मोहीम, व्लॉगमधून इतिहास मांडला.

गडकिल्ल्यांची स्वच्छता, संवर्धन मोहीम घरोघरी पोहोचावी, यासाठी जयंत पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीरगडावर ट्रेंडमध्ये असलेला व्लॉग तयार केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एका वेगळ्या माध्यमातून जनतेसमोर आले आहेत. गडकिल्ल्यांची स्वच्छता, संवर्धन मोहीम घरोघरी पोहोचावी, यासाठी जयंत पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीरगडावर व्लॉग केला आहे.जयंत पाटील यांच्या टेक्नोसॅव्ही, ट्रेंड फॉलो करणाऱ्या सवयीची कल्पना समर्थकांना आहेच. तंत्रज्ञानाची चांगली माहिती असल्याने त्यांना नुकतेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ‘AI’ समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. मात्र यावेळी जयंत पाटलांनी टेक्नॉलॉजीचा वापर एका आगळ्यावेगळ्या कारणासाठी केलाय.

गडकिल्ल्यांची स्वच्छता, संवर्धन मोहीम घरोघरी पोहोचावी, यासाठी त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीरगडावर ट्रेंडमध्ये असलेला व्लॉग तयार केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी राज्यातील गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. दिनांक 13 एप्रिल रोजी लंकेंनी ही मोहीम अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव किल्ल्यावर म्हणजेच धर्मवीरगडावर घेतली.

या मोहिमेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहभागी झाले होते व त्यांनी या ठिकाणी आपला व्लॉग शूट केला. जयंत पाटील यांनी आपल्या व्लॉगमध्ये गडकिल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम समजवून सांगतानाच धर्मवीरगडाचा इतिहासही मांडला.दरम्यान, सोशल मीडियाच्या युगात व्लॉग हा सर्वात प्रभावी व ट्रेंडींग माध्यम आहे. राज्यात पहिल्यांदाच एका राजकीय नेत्याने असा आगळावेगळा प्रयोग करून सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.