बहिणीची छेड काढण्यावरून वाद टोकाला, पुण्यातील धक्कादायक घटना.

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चंदननगर परिसरात गुरुवारी रात्री ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे यांनी मिळून प्रदीप अडागळे नावाच्या एका तरुणाची हत्या केली. बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद होता. याच वादातून आरोपींनी प्रदीपला टाटा गार्डनजवळ बोलावले होते.पुण्यात एक खळबळजनक घटना घडलीये. चक्क एका मुलाने आणि आईने मिळून भर रस्त्यावर फरशीच्या तुकड्याने एका तरूणाची हत्या केली. हैराण करणारे म्हणजे किती क्रूरपणे ही हत्या करण्यात आलीये, हे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून स्पष्ट दिसतंय. गुरुवारी रात्री चंदनगर परिसरात एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. प्रदीप बाबासाहेब अडागळे (वय २२, रा. आभाळवाडी, वाघोली) असे त्याचे नाव आहे. ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे यांनी हा खून केलाय.ऋषी काकडे आणि सुनीता काकडे या दोघांनी मिळून फरशीचे तुकडे प्रदीप अडागळे याच्या डोक्यात घातली.

या घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत प्रदीप अडागळे याला ससून येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे यांना अटक केलीये.अडागळे हा सतत ऋषी आणि त्याच्या आईला शिवीगाळ करत असे. बहिणीची छेड काढण्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला आणि त्यानंतर ऋषी आणि त्याच्या आईने मिळून प्रदीपची हत्या केल्याचे सांगितले जातंय. या प्रकरणाबद्दल बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी सांगितले की, काकडे यांचा भाजीचा व्यवसाय आहे.

प्रदीप अडागळे आणि ऋषी काकडे यांच्यात बहिणीची छेड काढल्यावरुन काही दिवसांपासून वाद सुरू होते.याच वादातून चंदननगरमधील टाटा गार्डनजवळ प्रदीप अडागळे याला बोलवण्यात आले होते. यादरम्यान वाद वाढला आणि तिघांनी मिळून प्रदीप अडागळे याच्या डोक्यात थेट फरशीचे तुकडे घालून मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी प्रदीप हा गंभीर जखमी झाला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. चंदननगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, प्रदीपचा मृत्यु झाल्याने खुनाची कलमे वाढवण्यात आली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.