माझा मित्र मला बोलावतोय… दोस्ताने आयुष्य संपवलं, विरह सहन होईना, दोन दिवसांनी सचिननेही तेच केलं.

मानसिक तणावातून मित्राने आयुष्य संपवलं, तर त्याच्या विरहाने खचलेल्या तरुणानेही आपल्या आयुष्याची अखेर करण्याचा निर्णय घेतलेल्या. अवघ्या दोन दिवसात बालपणीच्या मित्रांनी मृत्यूला कवटाळलं.नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी परिसरात दोन मित्रांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. सुपारी नगर न्यू येरखेडा येथील सचिन देशमुख (वय २८) या युवकाने आपल्या जिवलग मित्राच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी विष प्राशन करून आपलीही जीवनयात्रा संपवली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सचिन देशमुख आणि मोनल जगनाडे (२८) हे दोघे बालपणापासूनचे जिवलग मित्र होते. त्यांच्यात केवळ मैत्री नव्हे तर कौटुंबिक नातंही होतं. दोघेही एकत्र फिरत आणि प्रत्येक गोष्टीत एकत्र सहभागी व्हायचे. मात्र, काही महिन्यांपासून मोनल वैयक्तिक समस्यांमुळे मानसिक तणावात होता.

दारूचे व्यसन आणि वैवाहिक जीवनातील संघर्षामुळे मोनल खचून गेला होता. त्यातच पत्नी घर सोडून गेल्याने तो अधिकच एकटा पडला होता. आपले दुःख तो वारंवार सचिनकडे व्यक्त करत राहायचा.१२ एप्रिल रोजी मोनलने मानसिक तणावातून गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. या घटनेचा जबरदस्त मानसिक आघात सचिनवर झाला होता. मित्राच्या निधनाने तो पूर्णपणे खचला होता. त्याने जवळच्या मित्रांना सांगितले की, “माझा मित्र मला बोलावतोय…तो माझ्याशिवाय राहू शकत नाही…मला त्याला भेटायला जायचे आहे.

” या भावनिक अवस्थेत १४ एप्रिल रोजी सचिनने विष प्राशन केले. आईने वेळीच लक्ष दिल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या घटनेची नोंद नवीन कामठी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दोन दिवसांत दोन मित्रांनी आपलं आयुष्य संपवण्याचा पर्याय स्वीकारल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना युवकांच्या मानसिक आरोग्याच्या बाबतीत जागरूकतेची गरज अधोरेखित करते. गावात या घटनेबाबत शोक व्यक्त केला जात असून, या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.