शेतातील पांदण रस्त्याचा वाद जीवावर उठला, वृद्धाला एकटे पाहून आरोपींनी काढला काटा, तिघे अटकेत.

 अकोल्यातील पातूर येथे १२ एप्रिल रोजी एका ६० वर्षीय वृद्धाची हत्या झाली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात, शेतात जाण्याच्या रस्त्याच्या वादातून हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली होती.अकोल्याच्या पातूर येथे १२ एप्रिलच्या रात्री साडेनऊच्या सुमारास काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली होती. पातूर-तुळजापूर रस्त्यालगतच्या गावठाणात धारदार शस्त्राने वार करून 60 वर्षीय वृद्ध सय्यद जाकीर सय्यद मोहिद्दीन रा.मुजावर पुरा, पातूर यांचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती पातूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास चक्र फिरवली. प्राथमिक तपासात सुरुवातीला एका संशयिताला अटक केली.या खुनाच्या प्रकरणाचा अगदी जलद गतीने पातूर पोलिसांनी सखोल तपास करून खुनाचे खरे आरोपी शोधून काढून तिघांना अटक करून गुन्ह्याची कबुली नोंदवून घेतली आहे.

सय्यद जाकीर सय्यद मोहीदीन हे त्यांच्या शेत शिवारातील शेतात जनावरांना चारापाणी करून घरी परत येत असताना त्यांचा खून करण्यात आला. यावरून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या शेतात येण्या जाण्याचे पांदण रस्त्याच्या वादाच्या कारणावरून आरोपी नामे इजरार खान मुकद्दर खान रा. मुजावरपुरा पातुर याने धारदार हत्याराने फिर्यादीच्या वडिलांना पोटावर, छातीवर व दोन्ही हातांवर गंभीर वार केले.अशा तक्रारीवरून गुन्हा दाखल करून यातील आरोपी इजरार खान मुकद्दर खान रा. मुजावरपुरा पातुर याला अटक करून पुढील तपास पातुर पोलिसांकडून सुरू होता. या प्रकरणी पातूर पोलिसांचे एक स्वतंत्र तपास पथक तयार करण्यात आले. तपास करत असताना गोपनिय माहितीच्या आधारे यातील मृतक यांचे शेतातून जाण्या येण्यावरून संशयित व्यक्ती अल्तमश खान शहजाद खान याच्यासोबत सुद्धा वाद झाला होता.

त्याबाबत पोलिस स्टेशन पातुर अकोला येथे गुन्हा देखील दाखल आहे, अशी माहिती मिळाल्याने पोलीस ठाण्याच्या अभिलेख तपासला असता मयत इसमाचे तक्रारीवरून पातूर पोलीस स्टेशनमध्ये २०२१ साली गुन्हा दाखल असल्याचे आढळून आले. मिळालेल्या माहिती वरून अल्तमश खान शहजाद खान याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले व अल्तमश खान याची सखोल चौकशी केली असता त्याने मयत इसम सय्यद जाकीर सय्यद मोहीददीन याच्याशी शेतात जाण्याच्या रस्त्यावरून वाद झाल्याचे मान्य केले.पुढे याच कारणावरून तुळजापुर रोडने एकटा जात असताना त्याचा मित्र नवाज शाह बरकत शाह रा. जमादार प्लॉट पातुर याच्या मदतीने त्याच्या जवळ असलेल्या धारदार चाकुने वार करून खून केल्याची कबुली दिली. आरोपी अल्तमश खान शहजाद खान याने त्याचा चुलत भाऊ हमीद खान अनिस खान याला खून केल्याची माहिती देऊन त्याच्या मदतीने त्यांनी खुनात वापरलेले शस्त्र लपविले असे तपासा दरम्यान सांगितले. त्यावरून पातुर पोलीसांनी इतर दोन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सुद्धा गुन्हा कबूल केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.