तरुणाने जीव दिला, शेजारी मदतीला धावला; बॉडी रिक्षाने नेताना भीषण अपघात, शेजाऱ्याच्या मृत्यूने महाराष्ट्रात हळहळ.

 राजू शिंदे यांनी गळफास घेतल्यानंतर त्याचा भाऊ बाबासाहेब शिंदे यांना सहकार्य करण्यासाठी शेजार धर्म म्हणून शेख मुनाफ शेख हमीद हे सोबत दवाखान्यात दाखविण्यासाठी गेले होते.फुलंब्री शहरातील दरी फाट्याच्या परिसरात भरधाव कारने समोर चालणाऱ्या दुचाकीला मंगळवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास जोराची धडक दिली. या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कार चालकाविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख मुनाफ शेख हमीद असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर बाबासाहेब शिंदे असे गंभीर जखमी झालेल्याची नावे आहेत.फुलंब्री शहरातील दरी फाटा परिसरात राहणाऱ्या राजू अंबादास शिंदे (वय २८) याने मंगळवारी रात्री १२ वाजता राहत्या घरात गळफास घेतला. याची कुटुंबातील सदस्यांना माहिती मिळाल्यानंतर मृत राजूचा मोठा भाऊ बाबासाहेब शिंदे यांनी शेजारी राहणाऱ्या शेख मुनाफ शेख हमीद याला उठविले.

भावाने गळफास घेतल्याची माहिती त्यांना दिली.रिक्षा बोलावून राजू शिंदे यांना रिक्षाच्या माध्यमातून खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी राजू यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर, गळफास घेतलेल्या राजू अंबादास शिंदे यांचा मृतदेह पुन्हा रिक्षातून घरी नेण्याचे ठरवले. त्यानुसार दुचाकीवर राजू शिंदे याचा मोठा भाऊ बाबासाहेब शिंदे व त्यांच्या सोबतीला असणारे शेख मुनाफ शेख हमीद हे दोघे दुचाकीवर घराकडे निघाले.त्याचवेळी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास सिल्लोडकडे जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत शेख मुनाफ शेख हमीद हे ठार झाले तर बाबासाहेब शिंदे गंभीर जखमी झाले. दोघांनाही रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी खासगी रुग्णालय दाखल केले. या घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले आहे. कारचालकाच्या विरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फुलंब्री सिल्लोड रस्त्यावरील दरी फाटा परिसरात दुचाकीला धडक देऊन कारचालकाने धूम ठोकली होती. पोलिसांनी तत्परतने तपास करून वडोद बाजार पोलिसांना सदरील कारचालक अपघात करून फरारी होत असल्याची माहिती दिली. त्यानंतर वडोद बाजार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या पथकाने सदरील कारचालकाला पकडून त्याला फुलंब्री पोलिसांच्या स्वाधीन केली.दरी फाटा परिसरात राहत्या घरी राजू शिंदे यांनी गळफास का घेतला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी असा मोठा परिवार आहे.राजू शिंदे यांनी गळफास घेतल्यानंतर त्याचा भाऊ बाबासाहेब शिंदे यांना सहकार्य करण्यासाठी शेजार धर्म म्हणून शेख मुनाफ शेख हमीद हे सोबत दवाखान्यात दाखविण्यासाठी गेले होते. मात्र राजू शिंदे हे मयत झाल्याने त्याला रिक्षाच्या माध्यमातून घरी पाठवले. दुचाकीवर बाबासाहेब शिंदे व शेख मुनाफ शेख हमीद हे येत असताना काळाने घाला घातल्याने यात शेख मुनाफ शेख हमीद यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.