संपत्तीमुळे नाती झाली परकी, भावानेच सख्ख्या भावाचा काढला काटा; घटनेने खळबळ.

संपत्तीवरून भावा-भावांमध्ये वाद झाल्याचे अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत. नांदेडमध्ये मात्र संपत्तीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घडली आहे.संपत्तीवरून भावा-भावांमध्ये वाद झाल्याचे अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत. नांदेडमध्ये मात्र संपत्तीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात १६ एप्रिलला रात्री ही घटना घडली असून पोलिसांनी घटनेच्या काही तासातच आरोपी नागेश प्रल्हाद लाखे (वय ३०) याला अटक केली आहे. सुनील प्रल्हाद लाखे (वय ३४) असं मृत भावाचं नाव आहे.

सुनील आणि नागेश हे दोघे सख्खे भाऊ बिलोली शहरातील आंबेडकर नगर येथे राहत होते. सुनील हा मोठा तर नागेश हा लहान भाऊ होता. शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलतानपूरमध्ये त्यांच्या दोघांचीही शेती आहे. याच शेतीवरून दोघांमध्ये पूर्वीपासून वाद होत असे. मृत सुनील प्रल्हाद लाखे याचा विवाह झाला नव्हता. त्यामुळे तो नेहमी संपत्तीची वाटणी करण्यासाठी आग्रही होता. यासाठी त्याने भावाच्या पत्नीला अनेकवेळा शिवीगाळही केली होती.

भावाकडून होणाऱ्या नेहमीच्या त्रासाला वैतागलेल्या नागेश लाखे याने सुनील लाखे याच्यावर बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास राहत्या घरी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सुनीलचा जागीच मृत्यू झाला आहे. भावाची हत्या केल्यानंतर आरोपी पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती शिंदे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान आज कायदेशीर सोपस्कार व उत्तरीय तपासणीनंतर सुनील लाखे याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.