नातेवाईकांचे टोमणे ऐकून आई वडिलांनी तीन महिन्यांच्या चिमुकल्या जीवाला फेकले विहिरीत.

जालन्याच्या बदनापूरमध्ये एका विहिरीत तीन महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलग चौथ्यांदा मुलगीच झाल्याने निराश झालेल्या जन्मदात्या आई-वडिलांनीच तिला विहिरीत फेकून तिची हत्या केली.बदनापूर तालुक्यातील असरखेडा गावाच्या शिवारातील एका विहिरीत १२ एप्रिल रोजी एका तीन महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हलविली होती.अनैतिक संबंधातून मुलगी जन्मल्यामुळे खून झाला की अन्य काही कारणामुळे अशा सर्व चर्चा आणि शक्यतांची पडताळणी करून पोलिसांनी जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत जन्मलेल्या सर्व मुलींचा आणि त्यांच्या माता-पित्यांची माहिती जमविण्यास सुरुवात केली.

पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात तपास पथकात कार्यरत असलेले पोलिस हवालदार जितेंद्र तागवाले हे असरखेडा परिसरातील गावे, तांडे, वाड्यांमध्ये जन्मलेल्या बालकांची माहिती काढण्यात आली.यादरम्यान पोलिसांच्या हाती महत्वाची धागेदोरे लागली. चौथ्यांदा मुलगीच झाल्यामुळे पवार दाम्पत्याला काही जवळचे नातेवाइक अपमानित करीत असल्याचे पोलिसांना समजते. यानंतर पोलिसांनी याबद्दलची चाैकशी केली. लोकांमधील चर्चेतून याबद्दल पोलिसांना माहिती लागली. पोलिसांनी या चिमुकलीच्या खुनाचा शोध लावला. ज्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली आणि सर्वांनाच मोठा धक्का लागला.

जन्मदात्यांनीच त्या कवळ्या जीवाला संपवले.सलग चौथ्यांदा मुलगी झाल्यामुळे जन्मदात्या माता-पित्यांनीच तीन महिन्यांच्या चिमुकल्या जीवाला विहिरीत फेकून दिले. आई वडिलांनी देखील आपला गुन्हा कबूल केलाय. पवार दाम्पत्याला तीन मुली होत्या आणि चाैथी देखील मुलगीच झाल्याने ते निराश झाले. शेवटी त्यांनी तीन महिन्याच्या कवळ्य जीवाला थेट विहिरीत फेकून दिले. गावात या घटनेची माहिती मिळताच मोठी खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी अखेर याप्रकरणात मोठा खुलासा केला असून आई वडिलांनीच मुलीला विहिरीत फेकल्याचे स्पष्ट केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.