पुणे स्वारगेट डेपो अत्याचार प्रकरणात ८९३ पानांचे आरोपपत्र, दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री समोर, तो कायम…

पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात ८९३ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. घटनेच्या ५२ दिवसांत दाखल केलेल्या या आरोपपत्रात ८२ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली असून, पाच जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आरोपी घटनास्थळी हजर असल्याच्या पुराव्यासाठी एकूण बारा पंचनामे सादर केले आहेत. यात, सीसीटीव्ही फुटेज आणि गुगल सर्च हिस्ट्रीचाही समावेश आहे.स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरोधात ८९३ पानांचे आरोपपत्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. ए. मकानदार यांच्या न्यायालयात दाखल केले.  गुन्हा घडल्यानंतर ५२ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, त्यामध्ये ८२ साक्षीदार तपासून पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवले आहेत. एकूण बारा पंचनामे करण्यात आले असून, पाच महत्त्वाच्या पंचनाम्यांतून आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचे थेट व परिस्थितीजन्य भक्कम पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आले आहेत.

स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे पावणेसहा ते पावणेसातच्या दरम्यान घडली होती. गुन्हा केल्यावर पोबारा करून गुनाट गावी शेतात लपून बसलेल्या गाडेला पुणे पोलिसांनी तीन ड्रोन कॅमेरे, श्वान पथक आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने जेरबंद केले. न्यायालयाने आरोपीला १२ दिवस पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपी गाडे येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. तपास अधिकारी शैलेश संखे यांच्या पथकाने आरोपी गाडेविरोधात पुरावे गोळा केले. सरकारी वकील भाग्यश्री डागळे-संचेती यांच्यामार्फत आरोपपत्र दाखल करण्यात आले.घटनास्थळावर केस व शर्टाचे बटण सापडले असून, रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासणीत ते आरोपी गाडेचेच असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी गाडे गुन्ह्याच्या दिवशी स्वारगेट बसस्थानकात पहाटेपासून होता; तसेच तो पीडितेशी बोलत होता, असे पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पाहिले असून, त्यांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत. आरोपी गाडे लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल ससून रुग्णालयाच्या तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.

पीडितेने या अत्याचाराबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांना माहिती देऊन आरोपी गाडेचा शोध घेण्याची विनंती केली होती. या चालक-वाहकांना शोधून पोलिसांनी त्यांचे जबाव न्यायालयात नोंदवले आहेत. स्वारगेट एसटी स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी गाडे घटनास्थळी हजर असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात नमूद आहे. आरोपीच्या मोबाइल क्रमांकावरून सायबर तज्ज्ञांमार्फत त्याची गुगल सर्च हिस्टरी तपासली. त्यामध्ये आरोपी गाडे वारंवार अश्लील व्हिडिओ पाहात असल्याचे आढळले. त्यामुळे गुगल सर्च हिस्टरी पंचनामा करण्यात आला.ओळख परेडमध्ये पीडित तरुणीने आरोपी गाडेला ओळखले आहे.पोलिसांनी प्रथमच गुन्ह्याच्या तपासात तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी पंचनामा केला. त्यामध्ये शिवशाही बसमधून आवाज बाहेर येतो का, याची ध्वनी तंत्रज्ञांमार्फत पडताळणी करण्यात आली; मात्र आवाज बाहेर येत नसल्याचे समजले. गाडेचा फोन अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी प्रथमच गुगल सर्च हिस्टरी आणि सीसीटीव्ही पंचनामा करून आरोपी गाडे गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचे शोधून काढले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.