प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! १५ मेपर्यंत ‘या’ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटविक्री बंद, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय.

मध्य रेल्वेने चार स्थानकांवर फलाट तिकीटविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, १८ एप्रिल ते १५ मेपर्यंत आदेश लागू असणार आहे.मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्टीनिमित्त नियमित रेल्वे गाडयांसह १२००हून अधिक फेऱ्या चालवण्यास सुरुवात केली आहे. आगामी दोन महिने या फेऱ्या धावणार आहेत. सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या कुटुंबीयांना स्थानकात सोडवण्यासाठी मित्र परिवार आणि अन्य कुटुंबीय स्थानकात येतात. परिणामी रेल्वे फलाटांवर अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता असते.उन्हाळी सुट्टी निमित्त होणारी रेल्वे प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( सीएसएमटी ), लोकमान्य टिळक टर्मिनस ( एलटीटी ), कल्याण आणि पुणे स्थानकावरील फलाट तिकीटविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवार, १८ एप्रिल ते १५ मेपर्यंत आदेश लागू असणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांनी हे आदेश काढले आहेत.ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. अशा प्रवाशांना फलाट तिकीट उपलब्ध करावे. तिकीट खिडकीवरील गोंधळ टाळण्यासाठी फलाट तिकीटविक्री बंदीचे आदेश मराठी आणि हिंदी भाषेत प्रमुख आणि दर्शनीय ठिकाणी लावण्यात यावे, अशा सूचना प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

प्रवासी गर्दी विभागण्यासाठी सीएसएमटी आणि एलटीटी येथे प्रवाशांना रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा करण्यासाठी होल्डिंग एरिया उभारण्यात आले आहे. अशा परिसरात छत, पिण्याचे पाणी, रेल्वेगाड्यांचे वेळा दिसण्यासाठी नवे इंडिकेटर सुविधा उभारण्यात आले आहे. फलाटावर गर्दी करण्यापेक्षा अशा ठिकाणी प्रवासी उभे राहतात आणि संबंधित फलाटावर रेल्वेगाडी आल्यावर जातात. यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी ही तैनात करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.