गावठी कट्टा बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखा जळगांव कडुन अटक.
महेश्वर रेड्डी पोलीस अधिक्षक जळगांव यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथील पथकास जळगांव जिल्हात अनेक इसम हे दहशत माजविण्याच्या उद्देशाने अवैध अग्नी शस्त्र वापरत आहे. सदर बाबत गोपनिय माहीती काढुन अशा लोकांवर पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले.
त्यावरुन पोना श्रीकृष्ण देशमुख हे वरणगांव शहरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीतीच्या आधारे बातमी मिळाली की, वरणगांव शहरातील राज उर्फ मनोज याचे जवळ गावठी कट्टा बाळगत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावर बबन आव्हाड, वरिष्ठ पोलस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी पोह प्रितम पाटील, पोना श्रीकृष्ण देशमुख नेमणुक स्थागुशा जळगांव असे पथक तयार करुन तात्काळ राज उर्फ मनोज रा. वरणगांव याची माहीती घेवुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरुन राज उर्फ मनोज यास वरणगांव शहरातील तिरंगा चौकातील श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथील राज मोबाईल रिपेअरिंग या दुकाना जवळ मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव राज उर्फ मनोज सुरेश शिंदे वय ३९, रा. रामपेठ वरणगांव ह.मु. शिवराय चौक फुलगांव वरणगांव ता. भुसावळ असे सांगितले त्यावरुन त्यांची अंगझडती घेता त्याच्या ताब्यात २५,०००/- रु. किं. चे १ गावटी बनावठीची पिस्टल व ८,०००/- रु. किं.चे ८ जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द वरणगांव पोस्टे CCTNS No.. १६५/२०२४ शस्त्र अधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यास सदर गुन्ह्याचे पुढील तपास कामी वरणगांव पोस्टेचे ताब्यात देण्यात आले आहे.













