अमित शाहांनी तंबी दिलीय, फडणवीसांची चाकरी करा नाहीतर…’; शिंदे गटावर निशाणा साधताना राऊतांचे मोठे विधान.

 संजय राऊतांनी शिंदे गटावर जोरदार टीका करत अमित शहांनी त्यांना फडणवीसांची चाकरी करण्याचे फर्मान सोडल्याचा आरोप केला आहे, अन्यथा सरकारमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असा दावा त्यांनी केला. मुंबईत मराठी कुटुंबांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा मुद्दाही त्यांनी उचलला असून, यासंदर्भात अमित शहांकडे तक्रार करणार असल्याचे राऊत म्हणाले.ठाकरे गटाचे नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जहरी टीका केली. नाशिकमध्ये Nashik Thackeray Party Camp ठाकरेंच्या शिबिरामध्ये बाळासाहेबांच्या AI भाषणातून शिंदे गट आणि विरोधकांचा खरपूस समाचार घेतला होता. यावरून शिंदे गटाकडून बोलताना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे आम्हाला शिकवू नये असं म्हणत मंत्री शंभुराज देसाई यांनी राऊतांवर निशाणा साधला होता. याला राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अमित शाहांनी त्यांना तंबी दिली आहे की, फडणवीसांची चाकरी करा नाहीतर सरकारमधून दूर राहा, तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. मला माहित आहे त्यांच्या काय चर्चा असतात फार शहाणपणा करू नका. त्याच्यामुळे खातपीती घरं सोडून बाहेर कसे निघतील. त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलं आहे, आपण इथेच राहूया, चाकरी करू, भांडी घासू, गुलामी कर पण आता बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे आनंद दिघे शिकवू नये आणि बाळासाहेब ठाकरे सांगू नये, असं म्हणत संजय राऊतांनी देसाईंसह शिंदे गटावर निशाणा साधला आहे.मुंबईमध्ये मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना समोर आली होती. घाटकोपर येखील एक सोसायटीमध्ये मांसाहार करतात म्हणून त्यांना मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो, असं म्हणत त्यांना अपमानित केलं गेलं. यावरही राऊतांनी भाष्य केलं आहे. या संदर्भात एसंशिं पक्षाचे प्रमुख अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार आहोत. आरएसएसचे भैय्याजी जोशी यांनी घाटकोपर येथे जात घाटकोपर हे गुजरात्यांचं आहे. हे काय आहे, कसं आहे? आम्ही नक्कीच अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना कळवू. कारण त्यांना संपूर्ण मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे, त्याला भाजपसोबतच्या सर्व पक्षांचं मुक समर्थन असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.