आईच्या कुशीत निजलेल्या चिमुकलीला बिबट्याने उचललं, दोन वर्षीय बालिकेचा हृदयद्रावक अंत.

शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेतील बालिकेचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहून रुपनर कुटुंबाने हृदय हेलावून टाकणारा आक्रोश केला.जिल्ह्यात डांभूर्णी (ता. यावल) शिवारातील शेतात वास्तव्यास असलेल्या मेंढपाळ कुटुंबातील आईच्या कुशीत निजलेल्या दोन वर्षीय बालिकेला उचलून नेत बिबट्याने तिचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना काल बुधवारी मध्यरात्री घडली आहे. आज गुरुवारी (दि.१७) छिन्नविच्छिन्न अवस्थेत चिमुकलीचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर कुटुंबाने आक्रोश केला असुन, परिसरात भीती निर्माण झाली आहे. दिड महिन्यात बिबट्याने घेतलेला खान्देशातील हा चौथा तर यावल तालुक्यातील दुसरा बळी आहे. रत्नाबाई सतीश रुपनर (मूळ रा. आरवी ता. शिंदखेडा जि. धुळे) असे मृत बालिकेचे नाव आहे.धुळे जिल्ह्यातील आरवी (ता. शिंदखेडा) येथील रुपनर हे मेंढपाळ कुटुंब मेंढ्या चारण्यासाठी यावल तालुक्यात आले आहे.

डांभुर्णी शेत शिवारात असलेल्या प्रभाकर चौधरी यांच्या शेतात मेंढपाळ कुटुंब काही दिवसांपासून वास्तव्यास आहे. दिवसभर परिसरातील वनक्षेत्रासह मोकळ्या माळरानावर मेंढ्या चारल्यानंतर कुटुंब मोकळ्या जागेवर टाकलेल्या तात्पुरत्या पालामध्ये बुधवारी रात्री झोपले होते.मध्यरात्री शेजारील केळीच्या दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून आईच्या कुशीत झोपलेल्या रत्ना नावाच्या दोन वर्षाच्या बालिकेला उचलून नेले. गाढ झोपेत असलेली रत्नाची आई जिजाबाई रूपनर मुलीचा आवाज ऐकून जागी झाली. तिने आरडाओरड करीत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्या बालिकेला घेऊन अंधारात पसार झाला. कुटुंबासह मेंढपाळांनी व परिसरातील ग्रामस्थांनी लागलीच आजुबाजुच्या केळी बागांमध्ये बालिकेचा शोध घेणे सुरु केले.

काही अंतरावरच त्यांना शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेतील बालिकेचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहून रुपनर कुटुंबाने हृदय हेलावून टाकणारा आक्रोश केला.बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी विपूल पाटील, सुनील भिलावे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी पंचनामा करून बालिकेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. दरम्यान, आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी वन विभागाला पुढील कार्यवाही तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार घटनास्थळी पिंजरा व ट्रॅप कॅमरे लावण्याचे काम वन विभागाकडून सुरु करण्यात आले.यावल तालुक्यातील किनगाव शिवारात आईचा हात धरुन चालणाऱ्या बालकावर हल्ला करीत त्याचा बळी बिबट्याने घेतला. त्या बिबट्याला पकडण्याची परवानगी मिळाली आहे. दिड महिन्यापासून बाहेरच्या जिल्ह्यातील पथकांची मदत घेवून त्याला पकडण्यात वनविभागाला अपयश आले आहे. आता तालुक्यात दुसऱ्या घटनेत दोन बालिकेचा मृत्यू झाला. सध्या खरिपाच्या हंगामी तयारी सुरु असतांना बिबट्याच्या भीतीमुळे शेतीची कामे रखडत असल्याने संताप व्यक्त होत आहे.दि. ६ मार्च २०२५ -किनगाव-साकळी (ता. यावल) आईचा हात धरुन जाणाऱ्या केशा प्रेमा बारेला या बालकाचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू.-दि. १५ मार्च- नंदुरबार गणेश बुधावल शिवारात (ता. तळोदा) लिताबाई अशोक पाडवी यांचा बिबट्याचा हल्यात मृत्यू.- दि. १६ मार्च -नंदुरबार सरदार नगर (ता. तळोदा) दहा वर्षीय बालिका दीपमाला नर्सिंग तडवी हीचा बिबट्याचा हलल्यात मृत्यू.-दि.१७ एप्रिल-डांभूर्णी (ता. यावल) आईच्या कुशीत झोपलेल्या रत्नाबाई सतीश रुपनर या दोन वर्षीय बालिकेचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.