महाराष्ट्राचा मणिपूर होऊ देणार नाही; आदित्य ठाकरेंचा महायुतीवर घणाघात.

महाराष्ट्राला मणिपूर करण्याचा प्रयत्न सुरू असून, प्रवाहाविरुद्ध लढण्याकरिता वज्रमूठ एक करावी लागेल, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.’फोडा, झोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती भाजपने अवलंबली आहे. गेंड्याचे नसेल अशा कातडीचे हे राक्षसी सरकार आहे. जेथे सत्तेत येतात, तेथे जाती-धर्मांमध्ये कलह सुरू झाले. येत्या काळात भाजप हिंदुत्वालाच अडचणीत आणेल’, असा दावा शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी नाशिकमध्ये केला. महाराष्ट्राला मणिपूर करण्याचा प्रयत्न सुरू असून, प्रवाहाविरुद्ध लढण्याकरिता वज्रमूठ एक करावी लागेल, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.जिल्ह्यातील शिवसैनिकांसाठी मनोहर गार्डन येथे आयोजित निर्धार शिबिरात ‘महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? या विषयावर आदित्य ठाकरे बोलत होते.

महाराष्ट्राचा रोडमॅप ठरविण्यासह पक्षाची पुढील वाटचाल कशी असावी हे ठरविण्यासाठी हे निर्धार शिबिर असून, ते प्रत्येक जिल्ह्यांत घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. महायुतीचे सरकार सत्तेत येऊन शंभर दिवस झाले. परंतु, या काळात त्यांनी एकही चांगली योजना आणली नाही. आहे त्या योजना बंद करण्याची तयारी मात्र सुरू आहे. हे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने सत्तेत आलेले सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले, ‘निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले. राज्याचे कृषिमंत्री साखरपुडे जोरदार करण्यासाठी कर्जमाफी हवी का? असे विचारून शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.

आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली. त्यामुळे मोठ्याने आवाज होऊन हे व्यासपीठ खचल्याने गोंधळ उडाला.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली
अवकाळी पाऊस पडतोय, पण अजून रुपयाची मदत दिली नाही राज्य लुटले जातेय याकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावे याकरिता वेगवेगळे वाद निर्माण करण्याचा उद्योग वक्फ कायदा गरीब मुस्लिम बांधवांच्या फायद्याचा नाही ना अच्छे दिन आले, ना काळा पैसा भारतात आला भाजप सरकारच्या काळात दहापट अधिक भ्रष्टाचार वाढला नाशिकमध्ये लाडका कंत्राटदार योजना फडणवीस सर्वात अयशस्वी गृहमंत्री

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.