पाहुणा आला, गप्पांचा फड रंगला, घरातील इतर सदस्य बाहेर जाताच काढला काटा, मोठी खळबळ.

छत्रपती संभाजीनगरमधील न्यायनगर भागात घरी आलेल्या पाहुण्यानेच जीव घेतल्याची घटना उघडकीस आलीये. विलास पांडव या आरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पाहुणा म्हणून घरात राहण्यासाठी आलेल्या व्यक्तीने घरातील सदस्याचा गळा आवळून खून केल्याची घटना न्यायनगर भागात घडली. गौतम महादेव सदावर्ते (वय ४६ रा. न्यायानगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्यांचा खून केल्याप्रकरणी विलास पांडव (रा. बुटखेडा ता. जाफराबाद, जि. जालना) याला अटक करण्यात आली. ही घटना १५ एप्रिलला मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली.

या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम सदावर्ते यांचा १६ वर्षीय मुलगा अभिजित याने दिलेल्या तक्रारीनुसार १४ एप्रिलला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गौतम यांच्या सासरकडील नातेवाईक विलास पांडव त्यांच्या घरी आला.थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर, घरातील काही सदस्य आंबेडकर जयंती मिरवणुकीसाठी बाहेर गेले.सायंकाळी साडेअकराच्या सुमारास सदावर्ते कुटुंबीय घरी आले. माञ, दरवाजा आतून बंद होता. दरवाजा वाजवल्यानंतर विलासने दरवाजा उघडला. घरात प्रवेश केल्यावर, अभिजितने त्याचे वडील फरशीवर पोटावर पडलेले आणि निश्चेष्ट स्थितीत पडल्याचे पाहिले. त्यांच्या गळ्यावर दोरीने आवळल्याच्या स्पष्ट खुणा होत्या. वडिलांना अशा अवस्थेत पाहून अभिजित याने लगेचच पोलिसात धाव घेतली. या घटनेने ंमोठी खळबळ निर्माण झाली.

या प्रकरणी १५ एप्रिल रोजी अभिजित याच्या तक्रारीवरून पांडवविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत आरोपी विलास पांडव याला अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आपल्याच नातेवाईकांचा अशाप्रकारे पांडव याने खून का केला असावा, याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. विलास पांडव हा अगोदर घरी आला. मस्त गप्पा रंगल्या आणि त्यानंतर ही घटना घडली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.