म्हणूनच नाशिकच्या दर्ग्यावर कारवाई; संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप.

खासदार राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना दर्ग्याबाबत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत शंका उपस्थित केली.भाजपवाले आम्हाला घाबरतात. शिवसेनेची अजूनही दहशत आहे. आमच्या शिबिरात अनेक प्रकारचे अडथळे घालण्याचे प्रयत्न भाजपने केले. शहरात दर्ग्यावर बुलडोझर फिरवला जात आहे. गोंधळ निर्माण व्हावा आणि शिवसेनेचे शिबिर होऊ नये यासाठी भाजपने प्रशासनावर दबा आणून आजचा दिवस निवडला,’ असा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला.‘शिबिरावरील लक्ष दुसरीकडे वळावे म्हणून दर्ग्यावर बुलडोझर चालवायचा, हे कसले लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, तुम्हाला वातावरण नासवायचे आहे. ज्यांना देश तोडायचा आहे, त्यांनी दर्गे तोडले याचे आश्चर्य वाटत नाही,’ असा हल्लाबोलही त्यांनी केला.

खासदार राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना दर्ग्याबाबत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत शंका उपस्थित केली. ‘दर्ग्यावर कारवाई शंभर टक्के नंतर करू शकत होते. येथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे येत आहेत. सर्व सहकारी येथे दाखल झाले आहेत, म्हणून आजचा दिवस निवडला. तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते. म्हणून तुम्ही असे फालतू उद्योग करत आहात,’ असा दावाही त्यांनी केला.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना औरंग्याच्या कबरीचे तुष्टीकरण झाले होते.

काठेगल्ली परिसरातील दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटविताना भाजपने कोणताही मुहूर्त काढलेला नाही. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रशासनाने त्यांची भूमिका निभावली आहे. उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यात हिंदूंप्रति भावना शिल्लक राहिल्या असतील, तर त्यांनी आपली चूक कबूल करून याचे स्वागत करावे,’ असा पलटवार आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.