‘म्हाडाच्या लॉटरीत स्वस्तात घर मिळवून देऊ’, निवृत्त पोलिसाला गंडा; दाम्पत्याकडून ५२ लाखांची फसवणूक.

 शासकीय निवासस्थानात राहणाऱ्या पोलिसाची सेवानिवृत्ती जवळ आल्याने ते स्वतःच्या मालकीच्या घराच्या शोधात होते. याचवेळी त्यांच्या गावातील एक तरुण म्हाडाच्या घरांच्या खरेदी विक्रीमध्ये एजंट म्हणून काम करीत असल्याचे समजले.गिरणी कामगारांसाठी असलेल्या घरांच्या लॉटरीत स्वस्तात घर मिळवून देतो असे सांगून पती-पत्नीने निवृत्त पोलिसासह तीन ते चार जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी या दाम्पत्याविरुद्ध मुंबईतील वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याने आत्तापर्यंत ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.शासकीय निवासस्थानात राहणाऱ्या पोलिसाची सेवानिवृत्ती जवळ आल्याने ते स्वतःच्या मालकीच्या घराच्या शोधात होते. याचवेळी त्यांच्या गावातील एक तरुण म्हाडाच्या घरांच्या खरेदी विक्रीमध्ये एजंट म्हणून काम करीत असल्याचे समजले. पोलिसाने त्याच्याशी संपर्क करून घरांबाबत विचारणा केली.

त्याने म्हाडाने गिरणी कामगारांसाठी घरे बांधली असून त्यातील घरे स्वस्तात मिळवून देतो, असे सांगितले.बॉम्बे डाइंग मिल इमारतीमध्ये नेऊन त्याने एक खोली दाखवली. दोन खोल्या ६० लाखांमध्ये मिळवून देतो आणि मिल कामगारांची लॉटरी जाहीर होताच त्यांच्या नावावरून तुमच्या नावावर करून देतो असे एजंटने सांगितले. परिचयातील असल्याने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत पोलिसाने थोडी रक्कम त्याला दिली.पोलिसाने परिचयातील एजंटसोबत खोली खरेदीबाबत व्यवहार केल्याचे समजताच त्यांच्या दोन मेहुण्यांनीदेखील एजंटशी संपर्क साधला. त्यांनीही घरांसाठी पैसे देण्याची तयारी दर्शवली. तिघांनी मिळून ५२ लाख रुपये एजंट आणि त्याच्या पत्नीला दिले.

मात्र अनेक वर्षे उलटूनही घर मिळवून देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने निवृत्त पोलिसाने याबाबत वरळी पोलिस ठाण्यात तक्रार केली. या दाम्पत्याने आणखी काही जणांना फसविल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.दुसरीकडे, चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून पुण्याची ओळख बनलेल्या बाकरवडीचे उत्पादन करून त्याची ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्री करून फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणुकीच्या आरोपावरून पुण्याच्या सदाशिव पेठेतील ‘चितळे स्वीट होम’च्या मालकावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.