पुणे सातारा हायवेवर बर्निंग बसचा थरार, रस्त्यात वोल्वो पेटली, घाबरुन प्रवाशांच्या उड्या.

पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडीजवळ एका खासगी वोल्वो बसने अचानक पेट घेतला. चालकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली. आगीचे कारण अस्पष्ट असून, महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.पुणे सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत बर्निंग बसचा थरार बघायला मिळाला. सुदैवाने चालकाच्या सर्तकमुळे मोठा अनर्थ टळला आहे. वोल्वो कंपनीच्या खाजगी बसने अचानक पेट घेतला. काही वेळातच ही अख्खी बस जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. बसला लागलेली आग पाहून लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठी गर्दी दाखल झाली. स्थानिक नागरिक आणि रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवास्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आग बघून काही प्रवाशांनी थेट बसमधून उड्या मारल्या.दुपारी बाराच्या अंदाजात साताऱ्याहून पुण्याकडे निघालेल्या वोल्वो कंपनीच्या बसला मोठी आग लागली. आग लागल्याचे समजताच चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवून बस रस्त्याच्या बाजूला घेतली. त्यादरम्यानच आग लागल्याचे कळताच काही प्रवाशांनी बसमधून उड्या घेतल्या. त्यानंतर प्रवाशांना बसमधून सुरक्षेत बाहेरही काढण्यात आले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. बस अगदी काही वेळातच जळून खाक झाली. बसला लागलेल्या आगीचा धूर पाहून लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.स्थानिक नागरिकांनी आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र, आग पसरल्याने त्यांना आग विझवण्यात यश मिळाले नाही आणि संपूर्ण बस जळून खाक झाली. बस पेटल्याने महामार्गावर धुराचे लोट दिसत होती. ही बस साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना ही आग लागली. आगीची घटना घडल्यानंतर काहीकाळ महामार्गावर वाहतूक कोडीं निर्माण झाली.आगीत कोंडुस्कर या खाजगी कंपनीची वोल्वो बस संपूर्ण जळून खाक झाली. मात्र, आग नेमकी कशाने लागली याचे कारण अजून कळू शकले नाहीये. भर दुपारी बाराच्या दरम्यानच ही आग लागली. ज्यावेळी ही आगीची घटना घडली, त्यावेळी काही प्रवासी हे बसमध्ये होते. आग लागल्याचा अंदाज चालकाला आला आणि त्याने अजिबात वेळ वाया न घालता त्याने बस अगोदर रस्त्याच्या बाजूला लावली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.