घरी निघालेल्या दोन सख्ख्या भावांवर काळाचा घाला, दुचाकीवरील सुटले नियंत्रण आणि सर्वकाही संपले.

देहूरोड येथे केंद्रीय विद्यालयाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीपक राजोरिया आणि योगेश राजोरिया हे दोघे दुचाकीवरून जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. देहूरोड येथील केंद्रीय विद्यालयाजवळ सोमवारी (ता. १४) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन सख्खा भावांचा मृत्यू झालाय. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये. दीपक राजोरिया (वय ३४) आणि योगेश राजोरिया (वय ३१) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील ताबा सुटल्याने गाडी घसरली आणि अपघात झाल्याचे सांगितले जातंय. घटनेची माहिती मिळताच लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, देहूरोड येथील असणाऱ्या पारशी चाळ येथील रहिवासी दीपक राजोरिया आणि योगेश राजोरिया हे दोन सख्खे भाऊ दुचाकीवरून प्रवास करत होते. दुचाकीचा वेग असल्याने दुचाकीवरील त्यांचा ताबा सुटल्याने ती घसरली आणि दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मोठी गर्दी झाली.या घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित बचावकार्य हाती घेतले आणि दोघांचे मृतदेह पुढील तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात पाठवले.

या प्रकरणी पोलिसांकडून अपघाताचा तपास करण्याचे काम सुरु असून प्राथमिक माहितीत गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. अधिकचा तपास हा पोलिसांकडून केला जातोय. अजून काही माहिती पुढे येते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.हा अपघात परिसरात चर्चेचा विषय बनला असून स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. दीपक आणि योगेश यांच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले आहे. या भागात अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वेगात वाहन चालवल्याने आपल्याला जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे नियंत्रण ठेवून वाहने चालवावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.