
काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाण्याऱ्या शहरातच काँग्रेसला मोठं खिंडार पडले आहे. माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांनी कमळ हाती घेतल आहे.काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसला खिंडार पडले असून माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सह अनेक काँग्रेसच्या नगरसेवकांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचा कमळ हाती घेतला आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्ती काँग्रेसचे विद्यमान आमदार हेमंत ओगले आणि काँग्रेसनेते करण ससाणे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. श्रीरामपूरचे माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, माजी नगरसेवक अशिष धनवटे, शशांक रासकर यांच्यासह १० माजी नगरसेवकांनी १५ एप्रिल रोजी मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केलाय.
या प्रवेशामुळे राजकारणातील ‘किंगमेकर’ म्हणून ओळख असलेल्या विखे यांनी माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे गटाला मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. आगामी काळात अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपाची ताकद अधिक वाढविण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी जोरदार ‘बॅटींग’ सुरु केली आहे. श्रीरामपुरातील काँग्रेसचा एक मोठागट फोडण्यात विखेंना यश आले आहे. मुंबई येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात मंगळवारी दुपारी हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी भाजपचे नगर मधील जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर उपस्थित होते.श्रीरापुरातील काँग्रेसचे (ससाणे गट) १० प्रमुख स्थानिक नेते भाजपात सामील झाले आहेत.
त्यामध्ये माजी आ.स्व. जयंत ससाणे यांचे कट्टर समर्थक असलेले माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, माजी नगरसेवक अशिष धनवटे, शशांक रासकर, शामलिंग शिंदे, कैलास दुबय्या, मनोज लबडे, राजेंद्र आदिक, संजय गांगड, सोमनाथ गांगड यांचा समावेश आहे. ससाणे गटात गेल्या चार-पाच वर्षापासून पक्ष बदलाबाबत चर्चा सुरु होती. मात्र एकमत होत नसल्याने हा निर्णय होवू शकला नाही. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरकडे विशेष लक्ष दिले. डॉ. सुजय विखे हेही त्यात आघाडीवर असल्याने त्यांनी श्रीरामपूरच्या विकासासाठी सोबत काम करावे लागेल असा सल्ला श्रीरामपूरच्या प्रमुख स्थानिक नेत्यांना वेळोवेळी दिला. अखेर राज्यातील तसेच स्थानिक राजकारणातील बदलते प्रवाह पाहता योग्य निर्णय घेण्याची गरज भासल्याने हा निर्णय घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया काहींनी खासगीत बोलताना दिली.
Video Player
00:00
00:00