
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप अन् काँग्रेसची युती झाली आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार मात्र या युतीवर नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली आहे.सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप अन् काँग्रेसची युती झाली आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार मात्र या युतीवर नाराज आहेत. भाजप आणि काँग्रेसच्या युतीबाबत मला काहीही माहिती नाही, त्यांनी मला काहीही न विचारता हा निर्णय घेतला की काय, याबाबत माहिती घ्यावी लागेल. मी स्वतःला त्यांचा पालक समजत होतो, अशी शाब्दिक टीका भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी फडणवीसांच्या ‘त्या’ लाडक्या आमदारावर केली आहे.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी सकाळी माध्यमांना माहिती देताना स्पष्ट केले की, मी कार्यकर्त्यांना न्याय देणारा व्यक्ती आहे. भाजप आमदार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोबत येण्याचे आवाहन माध्यमांद्वारे करू नये. मी त्यांचा पालक आहे, असं मी तरी मानतो.
Video Player
00:00
00:00