
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका व्यावसायिकाने परिस्थितीला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.नागपुरात एका व्यावसायिकाने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘मी खूप थकलो, अडचणींचा सामना करून कंटाळलो, तू प्रॉमिस केलं मेहनत करून ऑफिसर होणार आहेस. तुझ्या आईची काळजी घे, धन्यवाद! लवकर पुन्हा भेटू’, अशा आशयाचा मजकूर लिहून फायनान्स व्यावसायिकाने पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गारखेडा परिसरातील सूतगिरणी चौकात घडली.
सुमेश सुरेश महाजन, वय ४५, रा. शारदाश्रम कॉलनी असं आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमेश हे फायनान्स व्यवसायिक आहेत. ते कुटुंबासह शारदाश्रम कॉलनीत वास्तव्यास होते. सुमेश हे पत्नी, आई आणि मुलीसोबत राहत होते. सूतगिरणी चौकात त्यांचं फायनान्सचं कार्यालय आहे. गेल्या काही दिवसांपासून ते व्यवसायामुळे तणावत होते.
Video Player
00:00
00:00