मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठकीत कैद्यांनी जेलमध्ये आत्महत्या केली किंवा त्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास सरकारकडून त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला.महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. महायुती सरकारमध्ये नाराजीनाट्याची चर्चा एकीकडे रंगताना दिसत आहे. रायगड येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणासाठी संधी देण्यात आली नव्हती.










