
उत्तर प्रदेशातील गुन्ह्यांचं प्रमाण गेल्या काही महिन्यांमध्ये वाढलं आहे. मेरठमध्ये झालेलं ड्रमकांड, फतेहपूरमधील तिहेरी हत्याकांड ताजं असताना आता प्रयागराजमधील यमुनानगरमधील एका गावात हृदयद्रावक घटना घडली आहे.लखनऊ: उत्तर प्रदेशातील गुन्ह्यांचं प्रमाण गेल्या काही महिन्यांमध्ये वाढलं आहे. मेरठमध्ये झालेलं ड्रमकांड, फतेहपूरमधील तिहेरी हत्याकांड ताजं असताना आता प्रयागराजमधील यमुनानगरमधील एका गावात हृदयद्रावक घटना घडली आहे. तरुणाला गव्हाच्या ओझ्याखाली जिवंत जाळल्याचा आरोप त्याच्या कुटुंबानं केला आहे. तर पोलिसांनी वेगळीच थिअरी मांडली आहे. तरुणाची हत्या करुन मग त्याचा मृतदेह जाळण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहेप्रयागराजच्या करछना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भुंडा चौकी परिसरातील इसौटा गावात ही घटना घडली. रविवारी सकाळी ग्रामस्थांना गावाच्या बाहेर असलेल्या बागेत एक अर्धवट जळालेला मृतदेह दिसला. ही बातमी संपूर्ण गावात वणव्यासारखी पसरली. गावात राहणाऱ्या अशोक कुमार यांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृत तरुण आपला मुलगा देवीशंकर असल्याचं अशोक यांनी ओळखलं.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा सुरु केला. पण कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी मृतदेह ताब्याच घेऊ दिला नाही. त्यांनी आरोपींच्या अटकेची मागणी लावून धरली.लोकांचा आक्रोश बघून पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी मोठा फौजफाटा घेऊन पोहोचले. ३० वर्षांचा तरुण देवीशंकर गावचा रहिवासी आहे. घटनास्थळापासून ४०० मीटरवर त्याचं घर आहे. त्याच्या कुटुंबानं आणि नातेवाईकांनी गावातल्याच काहींवर आरोप केले आहेत. देवीशंकरच्या वडिलांनी दिलेल्या पोलीस तक्रारीनंतर गावातल्या लोकांविरोधातच गुन्हा नोंदवण्यात आला आहे.लोकांचा आक्रोश बघून पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी मोठा फौजफाटा घेऊन पोहोचले. ३० वर्षांचा तरुण देवीशंकर गावचा रहिवासी आहे. घटनास्थळापासून ४०० मीटरवर त्याचं घर आहे. त्याच्या कुटुंबानं आणि नातेवाईकांनी गावातल्याच काहींवर आरोप केले आहेत.
देवीशंकरच्या वडिलांनी दिलेल्या पोलीस तक्रारीनंतर गावातल्या लोकांविरोधातच गुन्हा नोंदवण्यात आला आहे.इसौटा गावात रविवारी सकाळी साडे पाचच्या सुमारास ग्रामस्थ पीक कापणीला जात होते. तेव्हा त्यांना गावाबाहेरील बागेत अर्धवट जळालेला मृतदेह दिसला. याची माहिती पोलिसांना मिळताच ठाण्याचे प्रभारी मोठा फौजफाटा घेऊन पोहोचले. काही वेळातच मृताचे नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं जमले. फॉरेन्सिकच्या पथकानं घटनास्थळाची पाहणी करुन पुरावे गोळा केले.गावातल्याच काहींनी देवीशंकरची हत्या केल्याचा आरोप त्याचे वडील अशोक कुमार यांनी केला. ‘शनिवारी रात्री ८ वाजता आरोपी माझ्या लेकाला त्यांच्या शेतात गहूची पोती बांधण्यासाठी घेऊन गेले होते. तिथेच त्याची हत्या करुन जाळण्यात आलं,’ असा दावा अशोक कुमार यांनी केला. आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जाऊ दिला.पोलिसांनी इसौटा गावातील दिलीप सिंह, अजय सिंह, विनय सिंह, मनोज सिंह, सोनू सिंह, शेखर, मोहित आणि अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी ६ आरोपींना गावातूनच अटक केली. मुख्य आरोपी दिलीप उर्फ छोट्टन फरार आहे. देवीशंकर त्याच्या आई, वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो मजुरी करायचा. त्याला एक मुलगी आणि दोन मुलं आहेत. त्याच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे.
Video Player
00:00
00:00