विशाल गवळीने कारागृहात स्वत:ला संपवलं, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘पोस्टमार्टम रिपोर्ट…’

कल्याणमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. ज्यानंतर आता आरोपी विशाल गवळीने तुरुंगात आत्महत्या केली, या घटनेवर संशय व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशाल गवळी प्रमाणात प्रतिक्रिया दिली आहे.कल्याणमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या डिसेंबरमध्ये करण्यात आली. या घटनेनंतर लोकांमध्ये संताप बघायला मिळाला. मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी विशाल गवळी हा एक सराईत गुन्हेगार होता. हेच नाही तर त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. मुलीवर अत्याचार करून त्याने हत्या केली आणि मुंबईतून पळ काढत तो थेट शेगावला पोहोचला. पोलिसांनी त्याला सापळा रचत अटक केली होती. काही सीसीटीव्ही देखील आरोपीचे समोर आले होते.
पहाटे आरोपी विशाल गवळी याने मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली. आरोपीने शौचालयात टॉवेलने गळफास घेतल्याचे प्रशासनाने सांगितले.

मात्र, आरोपीच्या वकिलांनी मोठा संशय व्यक्त करत थेट म्हटले की, ही हत्या आहे. डिसेंबर महिन्यात कल्याणच्या कोळसेवाडी येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून स्वत:च्या घरी विशाल गवळीने नेले होते आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. यावेळी गुन्ह्यात त्याची पत्नी देखील सहभागी होती.विशाल गवळीने आत्महत्या केल्यानंतर विविध दावे केली जात आहेत. आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हे म्हणाले की, पोस्टमार्टम होईल आणि त्याचा रिपोर्ट येईल. त्यामध्ये दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल.

परंतू मी एवढेच सांगेल की, एका अल्पवयीन मुलीवर आरोपीने अत्याचार केला होता. त्याची केस आम्ही फास्ट ट्रॅक चालून त्याला फाशीची सजा व्हायला हवी होती, ही सरकारची भूमिका होती.आता त्याने आत्महत्या केलीये, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. याबद्दल बोलताना शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड हे म्हणाले की, भर चाैकात त्याला फाशी दिली असती तर आनंदोत्सव साजरा केला असता. जे झाले ते बरे झाले असे सुलभा गायकवाड यांनीही म्हटले आहे. आरोपीच्या वकिलांकडून मोठा दावा केला जातोय. आरोपीच्या वकिलांनी थेट संशय व्यक्त केला आहे.

  • Related Posts

    भरधाव ट्रकने पाच वाहनांना उडवलं, खंडाळा बोर घाटात बाप – लेकीवर काळाचा घाला; परिसरात हळहळ.

    खंडाळा बोर घाटात भीषण अपघात झाला असून या अपघातात बाप – लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे.खंडाळा बोर घाटात जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर भीषण…

    उशिरा येण्याचं कारण विचारलं, डॉक्टरांना राग अनावर, वृद्धाला बेदम मारहाण करत फरफटत रुग्णालयाबाहेर नेलं.

    जिल्हा रुग्णालयात एका डॉक्टरने ७७ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली आहे.मारहाण केल्यानंतर डॉक्टरच्या सांगण्यावरून २ लोकांनी मिळून त्या वृद्ध व्यक्तीला ओपीडीमधून फरफटत रुग्णालयाच्या बाहेर नेले.डॉक्टर हे देवाचे रूप असतात, असे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भरधाव ट्रकने पाच वाहनांना उडवलं, खंडाळा बोर घाटात बाप – लेकीवर काळाचा घाला; परिसरात हळहळ.

    भरधाव ट्रकने पाच वाहनांना उडवलं, खंडाळा बोर घाटात बाप – लेकीवर काळाचा घाला; परिसरात हळहळ.

    उशिरा येण्याचं कारण विचारलं, डॉक्टरांना राग अनावर, वृद्धाला बेदम मारहाण करत फरफटत रुग्णालयाबाहेर नेलं.

    उशिरा येण्याचं कारण विचारलं, डॉक्टरांना राग अनावर, वृद्धाला बेदम मारहाण करत फरफटत रुग्णालयाबाहेर नेलं.

    आपण गेम करणार आहोत; दुचाकीच्या वादातून दाजी-मेहुण्याचा जीव घेतला, मृत तरुणाची पत्नीच ताब्यात, महाराष्ट्रात खळबळ.

    आपण गेम करणार आहोत; दुचाकीच्या वादातून दाजी-मेहुण्याचा जीव घेतला, मृत तरुणाची पत्नीच ताब्यात, महाराष्ट्रात खळबळ.

    गाढ झोपेत असताना अचानक स्फोटाचा आवाज, आकाशातून कोसळला धातूचा तुकडा, नागपुरात खळबळ.

    गाढ झोपेत असताना अचानक स्फोटाचा आवाज, आकाशातून कोसळला धातूचा तुकडा, नागपुरात खळबळ.