विशाल गवळीने कारागृहात स्वत:ला संपवलं, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘पोस्टमार्टम रिपोर्ट…’

कल्याणमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. ज्यानंतर आता आरोपी विशाल गवळीने तुरुंगात आत्महत्या केली, या घटनेवर संशय व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशाल गवळी प्रमाणात प्रतिक्रिया दिली आहे.कल्याणमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या डिसेंबरमध्ये करण्यात आली. या घटनेनंतर लोकांमध्ये संताप बघायला मिळाला. मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी विशाल गवळी हा एक सराईत गुन्हेगार होता. हेच नाही तर त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. मुलीवर अत्याचार करून त्याने हत्या केली आणि मुंबईतून पळ काढत तो थेट शेगावला पोहोचला. पोलिसांनी त्याला सापळा रचत अटक केली होती. काही सीसीटीव्ही देखील आरोपीचे समोर आले होते.
पहाटे आरोपी विशाल गवळी याने मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली. आरोपीने शौचालयात टॉवेलने गळफास घेतल्याचे प्रशासनाने सांगितले.

मात्र, आरोपीच्या वकिलांनी मोठा संशय व्यक्त करत थेट म्हटले की, ही हत्या आहे. डिसेंबर महिन्यात कल्याणच्या कोळसेवाडी येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून स्वत:च्या घरी विशाल गवळीने नेले होते आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. यावेळी गुन्ह्यात त्याची पत्नी देखील सहभागी होती.विशाल गवळीने आत्महत्या केल्यानंतर विविध दावे केली जात आहेत. आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हे म्हणाले की, पोस्टमार्टम होईल आणि त्याचा रिपोर्ट येईल. त्यामध्ये दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल.

परंतू मी एवढेच सांगेल की, एका अल्पवयीन मुलीवर आरोपीने अत्याचार केला होता. त्याची केस आम्ही फास्ट ट्रॅक चालून त्याला फाशीची सजा व्हायला हवी होती, ही सरकारची भूमिका होती.आता त्याने आत्महत्या केलीये, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. याबद्दल बोलताना शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड हे म्हणाले की, भर चाैकात त्याला फाशी दिली असती तर आनंदोत्सव साजरा केला असता. जे झाले ते बरे झाले असे सुलभा गायकवाड यांनीही म्हटले आहे. आरोपीच्या वकिलांकडून मोठा दावा केला जातोय. आरोपीच्या वकिलांनी थेट संशय व्यक्त केला आहे.

  • Related Posts

    आधी फडणवीसांना कॉल, पण संवाद झाला नाही, मग शरद पवारांनी डायल केला थेट पुतण्याचा नंबर… दोघांमध्ये काय चर्चा झाली.

    पुरंदर विमानतळाच्या जागेसाठी शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. शरद पवारांनी या प्रकरणी लक्ष घालून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी बागायती क्षेत्र वाचवण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन…

    कडक ना भावा! IPLमध्ये श्रेयस अय्यर याने रचला इतिहास, धोनी ना कोहली अशी कामगिरी करणारा पहिलाच.

     गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला हरवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला, साई सुदर्शनच्या शतकामुळे दिल्ली कॅपिटल्सचा 10 विकेट्सने पराभव केला. या विजयामुळे गुजरात टायटन्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचले. श्रेयस अय्यर IPL मध्ये तीन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आधी फडणवीसांना कॉल, पण संवाद झाला नाही, मग शरद पवारांनी डायल केला थेट पुतण्याचा नंबर… दोघांमध्ये काय चर्चा झाली.

    आधी फडणवीसांना कॉल, पण संवाद झाला नाही, मग शरद पवारांनी डायल केला थेट पुतण्याचा नंबर… दोघांमध्ये काय चर्चा झाली.

    कडक ना भावा! IPLमध्ये श्रेयस अय्यर याने रचला इतिहास, धोनी ना कोहली अशी कामगिरी करणारा पहिलाच.

    कडक ना भावा! IPLमध्ये श्रेयस अय्यर याने रचला इतिहास, धोनी ना कोहली अशी कामगिरी करणारा पहिलाच.

    वडिलांच्या अंत्यविधीला जाताना मुलगी-नातवावरही काळाचा घाला, जगबुडी नदी पूल अपघातात मोरे कुटुंब हादरलं.

    वडिलांच्या अंत्यविधीला जाताना मुलगी-नातवावरही काळाचा घाला, जगबुडी नदी पूल अपघातात मोरे कुटुंब हादरलं.

    शिवसेना कार्यालयात भूत असल्याची अफवा, कार्यकर्ते फिरकेनात, खुद्द मंत्री पुढाकार घेत म्हणाले…

    शिवसेना कार्यालयात भूत असल्याची अफवा, कार्यकर्ते फिरकेनात, खुद्द मंत्री पुढाकार घेत म्हणाले…