चाळीसगावात भाजपाला मोठे खिंडार
उन्मेशदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांचे संजयजी राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश.
चाळीसगाव – येथील विधानसभेची जागा मिञ पक्षाला असल्याने शिवसेनेने आजपर्यंत चाळीसगाव मतदारसंघाकडे फारसे लक्ष दिले नव्हते. मात्र चाळीसगाव येथे येत असताना झालेले अभूतपूर्व स्वागत विसरता येणार नाही. सर्वत्र भगवे झेंडे , पोस्टर बॅनर यामुळे चाळीसगाव विधानसभा आता भगवी झाली असून अभ्यासू नेता उन्मेश दादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पार्टीतून आलेल्या सर्व मान्यवरांच्या हार्दिक स्वागत करतो. भाजपच्या भटक्या जाती जमाती आघाडी जिल्हाध्यक्ष चांगदेव राठोड सारख्या कार्यकर्त्याला त्याच्याच पक्षाच्या आमदाराने किती त्रास द्यावा याचे आगळेवेगळे उदाहरण आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीत इथली मूजोर सत्ता उलटवून टाकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे अधिक बळ महत्वाचे ठरणार असून आपले मनापासून स्वागत करतो. अशी भावना शिवसेना नेते माजी खासदार संजयजी राऊत यांनी व्यक्त केले.

भाजपाचा कार्यकर्त्यांचा जल्लोषात प्रवेश भारतीय जनता पार्टीचे भटक्या जाती जमाती विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष चांगदेव राठोड हे जनसंघापासून भारतीय जनता पार्टीत काम करत होते. त्यांनी आमदारांच्या छळाला कंटाळून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपातून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य दारासिंग राठोड, टाकळी प्रचा येथील पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तू बंकट मोरे, बेलगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा हिंगोणेचे माजी सरपंच बाळासाहेब पाटील, मेहूणबारे भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते गणेश साळुंखे, चेतन राजपूत चाळीसगाव गवळी समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णा गवळी, जुनोन्याचे उपसरपंच संजय केशव मोरे, वाडीलाल राठोड, ममराज पवार, सुनील गायकवाड, पुंडलिक राठोड, वाघळी भाजपचे जेष्ठ विधीतज्ञ ऍड.वाय एस पाटील, मा.महसूल मंत्री स्व उत्तमराव नाना यांची पुतणे प्रकाश सूर्यवंशी, दस्केबर्डे येथील गुलाब राजेंद्र महाजन,भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते शालिवान पाटील, भिकन पाटील, हिलाल चौधरी, बाबू पाटील, अमोल कोळी, शोएब पठाण, घोडेगाव येथील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान सहकारी जगन परशुराम राठोड, तुकाराम आगोणे, सहादू जाधव,पिंपळगाव निकुंभ येथील भाजप कार्यकर्ते मुरलीधर डोंगरे, रोहीदास डोंगरे, रोहिणीचे माजी सरपंच बळीराम जानकु तोंडे, नंदू किसन घुगे, क्रांतिवीर अशोक घुगे, राजेंद्र नागरे, भूषण गीते, पिलखोड भाजपाचे निष्ठावान सैनिक उपसरपंच संदीप संतोष मोरे व त्यांचे सर्व सहकारी, पिंपळगाव म्हाळसा येथील गणेश महाजन, महेंद्र पाटील, संदीप माळी, नामदेव माळी, धनराज माळी, अनिल महाजन, निलेश माळी, प्रदीप पाटील, दीपक गायकवाड, उमेश गायकवाड, भाऊसाहेब अहिरे, ईश्वर माळी, एकलव्य मित्र मंडळाचे मुकेश जाधव, नामदेव माळी, राजू आहीरे ,दिनेश देशमुख, सावता माळी, अण्णासाहेब महाले, देवळी येथील भाजपचे कार्यकर्ते सागर पाटील, राहुल पाटील, जगदीश सूर्यवंशी, पिंपरखेडचे उपसरपंच तथा भाजपा चिटणीस रवी दिलीप मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा त्याग करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे संजय राऊत यांच्या हस्ते स्वागत करून शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.
भारतीय जनता पार्टीत अंतर्गत बंडाळी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना कंटाळून अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करणार असून अनेकांनी उन्मेशदादा पाटील यांच्या अभ्यासू नेतृत्वात विश्वास ठेवत शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नारपार बचाव आंदोलनासाठी केलेले 28 तास सलग आंदोलनामुळे गिरणा खोऱ्यातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रभावित झाले असून आगामी काळात भाजपाचा त्याग करण्याची तयारी करत आहे.त्यांचा पक्षप्रवेश लवकरच होणार आहे.चाळीसगाव विधानसभेचा आमदार शिवसेनेचा अर्थात महाविकास आघाडीचा होईल अशी गर्जना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.
Post Views: 2,553